मच्छलीपट्टणम : दक्षिण पूर्व उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या सहा तासात ताशी २० किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकला असून आज सकाळी साडे पाच वाजताच्या सुमाराला तो मच्छलीपट्टणमच्या किनाऱ्यापासून ९३० किलोमीटर दार समुद्रात स्थिरावला आहे. हा पट्टा पुढच्या दोन दिवसात आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता असून येत्या २४ तासात या पट्ट्यात अधिक तीव्र दाब निर्माण होऊ शकतो. मात्र, आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनाऱ्यांवर पोहचताना त्याचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
इशारा
मुसळधार पाऊस :
येत्या २४ तासात अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी तर ८ आणि १० डिसेंबरदरम्यान उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पाडण्याची शक्यता आहे.
वारे :
याच काळात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून समुद्रही खवळलेला असेल.तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशातील काळात मच्छीमारांनी ९ डिसेंबरपर्यंत समुद्रात जाऊ नये अशा इशारा , हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.