फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य सेवा आपल्या दारी
खेडमध्ये अभिनव उपक्रम
रत्नागिरी, प्रतिनिधी ः आरोग्य सेवेच्या बाबतीत खेड नगरपालिकेने आता एक पाऊल पुढे टाकलं असून फिरता दवाखान्याच्या माध्यमातून डॉक्टर आपल्या दारी असणार आहेत. हल क्लाऊड क्लिनिकचे तसेच फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. यावेळी माजी आमदार संजय कदम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रेरणेने तसेच एचडीएफसी बँकेच्या सौजन्याने आणि हिरभाई बुटाला विचारमंच यांच्या माध्यमातून हे क्लिनिक उपलब्ध झाले आहे.
हल क्लाऊड क्लिनिकमध्ये रुग्णांची सर्व प्रकारची तपासणी होणार असून त्यामध्ये रक्तातील साखर , हिमोग्लोबीन , डोळ्याची तपासणी , वजन , ईसीजी , रक्तदाब , शरीरातील तापमान , सर्दी , खोकला याबाबतची सर्व तपासणी या यंत्राद्वारे होणार आहे . तपासणी केल्यावर छापील माहिती मिळणार असून त्यात रुग्णाचे निदान काय झाले आहे , हे समजणार असल्याने डॉक्टरांना पुढील उपचार करणे सोपे जाणार आहे , अशी माहिती यावेळी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिली.
फिरता दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य सेवा आपल्या दारी तसेच फिरता दवाखान्याच्या माध्यमातून खेड नगरपरिषदेने आरोग्य सेवा आपल्या दारी हा उपक्रम राबवलाय आहे. यामाध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना शहरी भागात अडचणी निर्माण होतात..आरोग्याच्या चांगल्या सुविधा नसल्यानं काही ठिकाणी रुग्ण दगावण्याच्या घटना देखील घडल्या आहे. त्यासाठी फिरता दवाखाना उपयोगी पडणार आहे. या व्हँनसोबत तज्ञ डाँक्टर असणार आहेत.रुग्णांच्या सर्व तपासणी आणि औषध देखील मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत..त्यामुळे हे फिरते दवाखाने खेड आणि दापोलीतल्या ग्रामीण भागासाठी वरदान ठरणार आहेत.