
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : भारतीय जनता पार्टी गांधीनगर विभागाचे अध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे यांच्या माध्यमांतून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच उद्देश गोर-गरीब रुग्णांना सेवा देण्याचा होता. या विभागातील गरजू नागरिकांनी शिबिराला प्रत्यक्ष भेटी दिल्याने मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रदिसाद मिळाला.
पूर्वेकडील गांधीनगर येथील कै. धर्मवीर आनंद दिघे सभागृहात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात डोळे तपासणी, रुग्णांची प्राथमिक आरोग्य तपासणी, मधुमेह, रक्तदाब, ई.सी.जी., रक्तगट, सांधेदुखी या व्यतिरिक्त इतर आजारांची तपासली तज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत होती. मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी उपमहापौर तथा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मोरेश्वर भोईर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला दुसाने, पूर्व मंडल अध्यक्ष संजीव बिडवाडकर, विभाग अध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे, वार्ड अध्यक्ष सुनील माळगावकर, विलास कांदिघोड, रवी नायर, मंदार जोशी, गौरव तावडे, चित्रा माने, राजश्री पांजणकर आदी उपस्थित होते.
यावेळी मोरेश्वर भोईर म्हणाले कि, राज्य सरकार आणि भाजपा विविध पातळीवर अनेक उपक्रम योजना कार्यान्वित होत असतात. प्रत्येक स्तरावर पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक बांधिलकी जपून काम करीत असतात. याचाच भाग म्हणून पंढरीनाथ म्हात्रे यांनी आरोग्य शिबीर कार्यक्रम घेतला आहे. खरं तर आरोग्य शिबिराला रुग्णांची संख्या कमी असणे जरुरीचे आहे. पण गोर-गरीब रुग्णांना हा एक वेगळा पर्याय आहे. विशेष म्हणजे आजच्या धगधगत्या जीवनशैलीत शरीराची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे अशा मोफत आरोग्य शिबिरात प्राथमिक तपासणी व डोळे तपासणी सर्वानीच करून घ्यावी. परंतु देवाला प्रार्थना आहे कि या शिबिरात सर्वांचे आरोग्य चांगलेच राहावे.
या मोफत आरोग्य शिबिरासाठी अमरज्योती प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. डॉ. चंद्रभूषण प्रजापती यांच्यासह त्यांचे सहकारी आणि सत्य साई प्लटीनियम हॉस्पिटलच्या डॉ. शिखा, सहकारी सुप्रिया, सागर, आकाश, मेहेश आदींनी रुग्णसेवा तसेच डोळे तपासणीसाठी विशेष मेहनत घेतली.















