मुंबई, (निसार अली) : सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन अंधेरी शाखेच्या वतीने स्थानिक फेरिवाल्यांनी केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत अंधेरी परिसरात सोमवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी मदत फेरी काढली. या मदत फेरीला नागरिक व फेरीवाल्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पस्तीस हजार रुपये इतकी रक्कम जमा केली. तसेच मुंबईसह देशाच्या विविध भागातून कार्यकर्ते मदतनिधी गोळा करत असल्याची माहिती देण्यात आली. ही रक्कम केरळ मुख्यमंत्री सहायतानिधीमध्ये जमा केली जाणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.