मुंबई, (निसार अली) : जनवादी हॉकर्स सभा या फेरिवाला संघटनेने फेरीवाल्यांच्या मागण्यांसाठी मालाड पूर्वेतून बोरिवली तहसीलदार कार्यालयावर दिनांक 29 ऑगस्ट रोजी मोर्चा काढला.
डोमोसाईल (वास्ताच्याचा दाखला) मिळवण्यासाठी तहसीलदार कार्यालयातून वेळकाढूपणा व टाळाटाळ, तसेच या साठी प्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक आहे. म्हणून या बाबत सरकारी नियमावली किंवा जीआरची छायांकित प्रत नोटीस बोर्डावर लावण्याची मागणी फेरिवाला संघटनेकडून करण्यात आली आहे. सद्या मुंबईत फेरीवाल्यांना लायसन्ससाठी पालिका अर्ज भरून घेत आहे. परंतु, अधिकारी नियमानुसार काम करत नाही, असा आरोप संघटनेने केला आहे. दरम्यान, या मोर्चात मालाड ते बोरीवलीतील फेरिवाले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.