नवी दिल्ली : तात्काळ इशारा आणि नियंत्रणाचे कार्य करणाऱ्या एमाब्रियर परिवहन विमानात हवेतल्या हवेत इंधन भरण्याची कामगिरी भारतीय हवाई दलाने फत्ते केली आहे. एमब्रिअर प्लॅटफॉर्मवर प्रथमच भारतीय हवाई दलाने अशा प्रकारची कामगिरी पार पाडली.
यासाठी असाधारण कौशल्याची आवश्यकता असून जगातल्या मोजक्याच हवाई दलांकडे हे कौशल्य आहे. हवेत उडत असताना केवळ 10 मिनिटे इंधन भरल्यामुळे विमान निर्धारित वेळेपेक्षा चार तास अधिक उडू शकते.