रत्नागिरी (आरकेजी): हवामान खात्याकडून पर्जन्यमान विषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार जिल्ह्यात वादळीवारा व वीजांच्या गडगडाटासह 07 जून ते 10 जून 2018 रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी जनतेने सावधानता बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.
दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झालं आहे.
खेड- तालुक्यात मौजे मुरडे येथे सुरेश महादेव शिबे यांच्या घराचे अंशत: 5 हजार 400 रुपये, मौजे वडगाव येथे संजय भिकू गोरिवले यांच्या घराचे अंशत: 37 हजार 120 रुपये, मौजे शिवतर येथे दिपक सिताराम नलावडे यांचे घराचे 5 हजार रुपये, सूचित सूर्यकांत नलावडे यांचे घराचे 21 हजार, श्रीराम खंडू मोरे यांचे घराचे 32 हजार 150 रुपये, श्रीकांत श्रीराम नलावडे यांचे 13 हजार 500, गिता गंगाराम मोरे यांचे रुपये 15 हजार रुपये नुकसान झाले आहे. मौजे कुळवंती जांभुळगाव येथे विनोद राजाराम निकम यांचे घराचे 1 लाख 95 हजार रुपये व विजय महादेव निकम यांचे घराचे 1 लाख रुपये नुकसान झाले आहे. तर गुहागर तालुक्यातील मौजे कोंडकारुळ येथे सिताराम गजानन पालशेतकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 9 हजार 600 रुपये व मौजे अडूर येथे विलास पाडुरंग देवळे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 890 रुपये नुकसान झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यात मौजे ओजरे खुर्द येथे उमेंद्र शांताराम कुळृये यांच्या गाईचा वीज पडून मृत्यू झाला आहे. मौजे देवळे येथे तुकाराम कृष्णा भालेकर यांच्या घरावर वीज पडून घराचे अंशत: नुकसान झाले आहे. जिवीतहानी झाली नाही. मौजे अणदेरी येथे सुभाष पांडुरंग घोडे यांच्या घरावर वीज पडून त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यात मौजे उडी येथे उदय काशिनाथ कोलगे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 7 हजार 500 रुपये, मौजे चाकेरी येथील प्रकाश रघुनाथ मयेकर यांच्या घराचे अंशत: 7 हजार 800 रुपये, रघुनाथ प्रकाश मयेकर यांच्या घराचे 54 हजार 500 रुपये नुकसान झाले आहे. मौजे भंडारपुळे येथे रामचंद्र जगन्नाथ वारेकर यांचे घराचे वीजपडून अंशत: 14 हजार रुपये, कृष्णा वासुदेव सुर्वे यांचे घराचे 6 हजार रुपये व सुभाष महादेव पाटील यांचे 5 हजार रुपये नुकसान झाल्याचे जिल्हा नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे.