मुंबई, (निसार अली) : मढ येथील हवाई दलाच्या केंद्रात मढ कोळीवाड्यातील कोळी भगिनिंनी हवाई दलातील सैनिक आणि अधिकाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. हवाई दलाच्या या केंद्रात देशाच्या विविध भागातून सैनिक व अधिकारी येतात. त्यांना कुटुंबापासून दूर रहावे लागत आहे. त्यामुळे कुटुंबासोबत सण साजरे करता येत नाही. म्हणूनच ‘मायभूमीचे रक्षण करणार्यांनो, आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत ,’ असा संदेश देत कोळी भगिनिंनी राख्या बांधल्या.