मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्री दिवंगत हौसाआई आठवले यांचा जलदान विधी आणि श्रद्धांजली सभा उद्या रविवारी १९ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी १० वाजता बांद्रा येथील संविधान निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. पूज्य भदंत राहुल बोधी महस्थाविर आणि पूज्य भिक्खू संघाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल, अशी माहिती शोकाकुल आठवले परिवारा तर्फे देण्यात आली आहे.
दरम्यान, शनिवारी मंत्री रामदास आठवले यांच्या सांत्वनासाठी महाराष्ट्रच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटिल, राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी खासदार एकनाथ गायकवाड, राज के पुरोहित, माजी आमदार बदमराव पंडित, अनिल जगताप अनिल कोचरे, चंद्रकांत नवले यांच्यासह राज्यातील अनेक लोकप्रतिनिधीनी सांत्वनपर भेट दिली.