
रत्नागिरी, (आरकेजी) : हौदात पडलेल्या गव्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. चिपळूण तालुक्यातील करंबवणे वरचीवाडी येथे ही घटना घडली.
आंबा बागेत बांधलेल्या हौदामध्ये रात्री गवा पडला. वनविभागाला याची माहिती देण्यात आली. गवाला प्रथम बेशुद्ध करण्यात आले. दोरीच्या सहाय्याने अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला काढण्यात आले.
जंगलातील पाणवठे आटल्याने गवे मानवी वस्तीकडे वळत आहेत. त्यामुळेच हा गवा पाण्याच्या शोधात आला असावा आणि हौदात पडला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.