
मुंबई,दि. ११ (प्रतिनिधी) – हास्य जत्रा फेम अरुण कदम यांनी भांडुप पश्चिम येथे येऊन राजुल कदम यांचा प्रचार केला. राजुल कदम या भांडुपकर असून त्यांच्या आजी आजोपांसून समाजसेवेचा वसा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे भांडुपकरांची लेक असलेल्या राजुल पाटील यांना निवडुण द्या असे आवाहन कदम यांनी केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुक प्रचार आता अंतिम टप्प्यावर आला असून प्रचाराचा हा शेवटचा रविवार असल्याने सर्वच उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचारावर जोर दिला आहे. शिवसेना (उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार राजुल संजय पाटील यांनी ही घरोघरी जाऊन प्रचार केला. राजुल यांना भांडुपकरांचा पाठिंबा मिळाला असून त्यांच्या प्रचार फेरीत हजारो भांडुपकर आले होते. हास्य जत्रा फेम अरुण कदम यांनी भांडुप मध्ये येऊन राजुल पाटील यांचा प्रचार केला. राजुल ही मेहनती, समाजसेवा करणारी असून ती भांडुपकरांची लेक आहे. तिला निवडुण द्या असे आवाहन त्यांनी केले.















