दापोली (आरकेजी) : दापोली तालुक्यातील हर्णै समुद्रकिनारी पुन्हा एकदा अॉक्टोपस आढळला आहे. हर्णै समुद्रकिनारा मुळातच मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे सापडतात आणि त्यामुळेच हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र झाले आहे. आता येथे अॉक्टोपस सापडल्याने हा किनारा पुन्हा चर्चेत आला आहे.
ऑक्टोपस ही समुद्र तळाशी राहणारी प्रजाती आहे. याला मराठीमध्ये अष्टपाद असे म्हणतात. आठ बाहू असणारा ऑक्टोपस हा जलचर प्राणी आहे. ऑक्टोपस वंशामध्ये एकूण लहान मोठ्या ५० जाती आहेत. त्यामुध्ये लहानात लहान २.५० सेमी तर मोठ्यात मोठी ९.७ मीटरची प्रजाती आढळते. हा प्राणी विशेषत: खोल समुद्रात राहत असला तरी तो उथळ भागामध्येही राहू शकतो. स्वसंरक्षण करण्यासाठी ऑक्टोपस शाईसारखा एक द्रव बाहेर टाकतो. त्याच्या शरीराची रचना गोलाकार, फुगवटा असलेली असते. त्याला डोळे आणि आठ प्रकारचे लांब हात असतात. हा जगातील महासागरामध्ये रहात असून, विशेषतः उबदार आणि उष्ण कटीबंध भागामध्ये राहतो. याला खोल समुद्रातील राक्षसही म्हटले जाते. ऑक्टोपसचे एरवी चित्रपट आणि संग्रालय यामध्येच दर्शन घडते. हर्णे समुद्रकिनारी डॉल्फीन माशांचे अधुमधून दर्शन घडत असते. त्यामुळे येथील समुद्रकिनार्याला पर्यटकांची अधिक पसंती आहे. मात्र, या डॉलफीनबरोबर अन्य दुर्मीळ सागरी जीवांचेही दर्शन घडू लागल्याने लाडघर समुद्रकिनार्याला पर्यटनाचा वेगळाच साज चढू लागला आहे. यामुळेच पर्यटकांची पसंती असणारा हर्णे समुद्रकिनारा हा पर्यटकांना पर्यटनाची साद घालणारा ठरत आहे. या किनारी दुर्मीळ ऑक्टोपसचे दर्शन घडल्याने स्थानिक तसेच पर्यटकही मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर जमले होते.














