रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात किना-यावर आलेल्या आलिव्ह रिडले जातीच्या जख्मी कासवाला उपचार करून पुन्हा समुद्रातील पाण्यात सोडून हर्णेतील तरुणांनी या समुद्री कासवाला जीवदान दिलं आहे. मासेमारी जाळीत पाय अडकल्यामुळे हे कासव किना-यावर आले असण्याची शक्यता आहे.
सुमारे 30 किलो वजनाचे कासव जखमी अवस्थेत किना-यावर आले होते. हर्णे समुद्रकिनारी आलिव्ह रिडले जातीचे कासव जख्मी अवस्थेत किना-यावर आले होते . समुद्राला ओहटी असल्यामुळे ते किनाऱ्यावरील वाळूत निपचित पडले होते. मात्र समुद्र किना-यावर फेरफटका मारणा-या काही तरुणाचे लक्ष जख्मी कासवाकडे गेले असता त्यांनी या कासवाच्या पायात अडकलेली जाळी काढून टाकली , व त्याच्यावर औषध उपचार करून पुन्हा समुद्रात सुखरूप सोडून दिले. समुद्रातील नैसर्गिक बदल व तुटलेली जाळी, प्लास्टिक कचऱ्यात अडकून वेळोवेळी आलिव्ह रिडले कासवांचा नाहक बळी जात असल्याने दुर्मिळ अलिव्ह रिडले समुद्री कसवांचे आदिवास धोक्यात आले आहे.