मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरून प्रवास करणार्या चाकरमान्यांचे आज पहाटेपासून हाल झाले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी गुरू तेग बहाद्दूर नगर या रेल्वे स्थानकाजवळ पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी एका मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले. त्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
पहाटेपासूनच हार्बरच्या सर्वच स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती. प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष खबरदारी घेत मेन लाईनमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल अशा विशेष लोकल सोडल्या. प्रवाशांनी ठाणे-पनवेल या ट्रान्सहार्बरवरुन प्रवास करावा, असे आवाहनही मध्य रेल्वे प्रशासनाने केले.
दरम्यान, मालगाडीचा अपघात आहे की घातपात याचीही चौकशी केली जाणार आहे.