रत्नागिरी, (आरकेजी) : आवक वाढल्याने हापूसचे दर सर्वसामांन्यांच्या आवाक्यात आले आहेत. सुरुवातीला पाचशे ते आठशे रुपये डझन असा भाव असणारा हापूस ६० ते १०० रुपये असा आला आहे.
उकाडा वाढल्याने झाडावरील आंबा तयार होण्याचा वेग वाढला. पाऊस पडू लागल्याने आंबा काढणीचा वेग वाढला आहे. त्यामुळे बाजारात आवक वाढली. यामुळेच हापूसचा दर गडगडला. ग्रामीण भागात ४०० ते ७०० रुपये शेकडा असे दर आहेत. भाव कमी झाल्याने आंबे खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
रत्नागिरी हापूससह देवगड हापूस, पायरी आणि रायवळ आंब्याची बाजारपेठेतील मागणी वाढली आहे. स्टॉल्सवर १०० डझनापर्यत आंबा विक्री होत आहे.