मुंबई : रामभक्त, पवनपुत्र व महाबली हनुमानाचा जन्मोत्सव सगळीकडे आज मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पहाटेपासूनच भाविकांनी मारुतीच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली आहे. विक्रोळी कन्नमवार नगरातील प्रसिध्द अशा हनुमान नगरातील स्वयंभू हनुमान मंदिर आणि इमारत क्रमांक १४० च्या पटांगणात असणार्या हनुमान मंदिरातही भक्तिमय वातावरणात जन्मोत्सव होत आहे.
१४० च्या पटांगणात असणार्या मंदिराला खास सजावट करण्यात आली आहे. पहाटेपासूनच भक्त दर्शनासाठी मंदिरात येत आहेत. रात्री ८ ते १० या वेळेत महाप्रसाद ठेवण्यात आला आहे, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अरुण रावले यांनी केले आहे. मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गिरीष मळगावकर, विलास आढाव, जितेश मोडसिंंग, अमोल मळगावकर, समीर सावळ, संतोष रावले, सचिन मोडसिंग, पंकज नायक आदी उत्सव साजरा होण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.