मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक ह. मो. मराठे यांच्या निधनाने एक प्रयोगशील संपादक आणि बहुपेडी लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, ह. मो. मराठे यांनी विविध प्रमुख नियतकालिकांच्या माध्यमातून दाखवलेली प्रयोगशीलता मराठी पत्रकारितेतील एक महत्वपूर्ण अध्याय आहे. वाचकांची नस अचूक जाणणाऱ्या ह.मो.मराठे यांनी मराठी साहित्यातही मोलाची भर घातली. विशेषतः सामाजिक आशयाच्या त्यांच्या कादंबऱ्या मराठी साहित्याला समृद्ध करणाऱ्या असून त्यांच्या निधनाने एक साक्षेपी संपादक आणि लेखक आपण गमावला आहे.