
- २२ जानेवारी रोजी रत्नागिरीत होणार ‘भक्ती उत्सव’
- श्री श्री रविशंकर यांची विशेष उपस्थिती असणार
रत्नागिरी : विश्वशांतीचे अग्रदूत गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर मैदानामध्ये सायंकाळी ६ वाजता भक्ती उत्सव संपन्न होणार असून, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक समृद्धीचे महत्त्व वाढवणाऱ्या या सोहळ्याच्या ठिकाणच्या कामाची सुरुवात गुरुपूजनाने करण्यात आली.
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम प्रथमच रत्नागिरीत होत आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या या उत्सव भक्ती कार्यक्रमाची याच उत्साहात तयारी सुरू झाली आहे. सोशल मीडियावर गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या प्रवचनांचे व्हिडिओ प्रसारित होत असून, अधिकाधिक लोकांना या भक्ती उत्सवाचा आनंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

ज्या मैदानावर हा भक्ती उत्सव कार्यक्रम होणार आहे, त्या मैदानावर रविवार, १८ रोजी गुरुपूजन करण्यात आले. या गुरुपूजेला रत्नागिरीतील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीममधील या भक्ती उत्सवाच्या संयोजिका आणि आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर अॅड. जया सामंत, आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर्स सोनिया, विनिता गोखले, भुवना महागावकर, नितीशा मोरे, अनघा देशपांडे, नीलेश मिरजकर उपस्थित होते.















