नवी मुंबई : नवी मुंबई परिसरातील समस्त खान्देश मित्रमंडळ संस्थेमार्फत गुरुपोर्णिमेनिमित्त आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारती विद्यापीठाचे 55 शिक्षक व पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे 45 शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. गुरुपोर्णिमेनिमित्त खान्देश मित्रमंडळामार्फत शिक्षकांचा सत्कार करण्याचे हे 15 वे वर्षे आहे. खान्देश मित्रमंडळ संस्थेचे अध्यक्ष हिरामण पाटील व सचिव देवेसिंग राजपूत यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. यावेळी खान्देश मित्रमंडळ संस्थेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या अभिनव कल्पनेचे सर्वत्र कौतूक होत आहे.