
उपमुख्याध्यापक किशोर लेले यांचा सत्कार करताना संघटनेचे कार्यवाह संतोष शिंदे
रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : बुद्धीमत्ता, सेवाभावी वृत्ती व सकारात्मक ऊर्जा प्रत्येक माणसांत असते. त्यामुळे स्वतःची ताकद शोधा, त्याचा उपयोग चांगल्या कामांसाठी करा, असे आवाहन जि. प. चे माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश जोशी यांनी केले. रत्नागिरी तालुका अशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी सेवक संघातर्फे फाटक हायस्कूलमध्ये कर्मचार्यांच्या पाल्यांच्या सत्कार संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
जि. प. चे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, फाटक हायस्कूलचे उपमुख्याध्यापक किशोर लेले, संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटणकर, जिल्हा कार्यवाह प्रकाश साळवी, सहकार्यवाह मन्सूर पाते, माध्यमिक शाळा सेवक पतपेढीचे माजी अध्यक्ष भाई शिंदे, पतपेढीचे शाखा संचालक विजय चव्हाण, तालुकाध्यक्ष रामचंद्र केळकर, सचिव संतोष शिंदे, उपाध्यक्ष शंकर पालवकर, सल्लागार शेखर लेले आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नरेंद्र गावंड यांनी संघटनेच्या उपक्रमाबाबत कृतज्ञता व्यक्त केली. सत्कारांमधूनच मी घडलो, असे सांगत गुणगौरव झालेल्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. २००९ पासून संघटनेतर्फे कर्मचार्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो आहे. कर्मचारी स्वखर्चातून हा स्तुत्य कार्यक्रम राबवत आहेत. निवृत्त कर्मचारी सुध्दा आवर्जून हजेरी लावतात, असे तालुकाध्यक्ष केळकर यांनी यावेळी
सांगितले.