चिपळूण:कुणबी शिक्षण मंडळ चिपळूण आयोजित तालूक्यातील १० वी १२ वी च्या विद्यार्थांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच कै. बाळाराम सा. उदेग यांचे नावे गुणवंत विद्यार्थांना पारितोषिक वितरण सोहळा संस्थेच्या कै.माधवराव बाईत विद्यार्थी वसतिगृह खेर्डी येथील सभागृहात मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.सर्वप्रथम कै. दादासाहेब बाईत यांच्या पुतळ्याला पुष्पहार, दिपप्रज्वलन, कुणबी बहुजनांच्या महामानवांना पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.कुणबी शिक्षण मंडळ चिपळूण संस्थेने आयोजीत केलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक श्री गजानन वाघे यांचे जेष्ठ बंधू कै. सुरेश गो. वाघे, यांना उपस्थित समाज बांधवांच्या वतीने संस्थेच्या सभागृहात दोन मिनिटं उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली समाजातील विद्यार्थी टँलेंट आहेत हे यातून अधोरेखित झाले. माञ पालकांनी सजग झाले पाहिजे. यापुढील शैक्षणिक वाटचाल करताना मुलाचा कल बघून योग्य ते क्षेञ निवडले पाहिजे. कोणते क्षेञ निवडावे यासाठी काही पालकांची गफलत होत असेल तर त्यांनी योग्य व्यक्तिकडून मार्गदर्शन घ्यावे.या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व विशवस्थ, आजी माजी संचालक , संस्थेचे हितचिंतक आणि पालक मोठ्या संखेने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मा श्री विलासशेठ खेराडे साहेब, विश्वस्त आणि माजी सभापती मा श्री सुरेश खापले सर, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका चिपळूण आणि कुणबी शिक्षण मंडळ चिपळूण मुंबई चे विद्यमान अध्यक्ष मा श्री चंद्रकांत कोकमकर सर, कुणबी युवा सेक्रेटरी आणि संचालक गजानन वाघे सर आणि मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे संचालक सेक्रेटरी श्री. संजय तांदळेसर यांनी प्रास्ताविक-सुञसंचलन, संचालक सहसेक्रेटरी श्री. मांडवकर सर यांनी सुञसंचलन केले.