मुंबई : हिंदुजा समूहाची कंपनी गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेडने (जीओएलआयएल) आज ३० जून २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीचे अनऑडिटेड आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. निकालाची महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –
पहिली तिमाही आर्थिक वर्ष १८- १९ , पहिली तिमाही आर्थिक वर्ष १७- १८ , विकास टक्केवारी
निव्वळ उत्पन्न – ३९०.३६ – २८०.५ – ३९.३९ टक्के
व्याजदर, घसारा आणि करपूर्व उत्पन्न (ईबीआयडीटीए) – ६४.५१ – ४९.३३ – ३०.७७ टक्के
करपूर्व नफा (पीबीटी) – ६१.८० – ५२.२४ – १८.३० टक्के
करोत्तर नफा (पीएटी) – ४०.३ – ३४.२९ – १७.०३
ईपीएस (मूलभूत) – ८.०७ – ६.९१
आर्थिक वर्ष २०१९ च्या पहिल्या तिमाहीतील निव्वळ उत्पन्न आर्थिक वर्ष २०१८ च्या पहिल्या तिमाहीतील २८०.५ कोटी रुपयांवरून ३९.३९ टक्क्यांनी वाढून ३९०.३६ कोटी रुपयांवर गेले आहे. तिमाहीदरम्यान कंपनीचा निव्वळ नफा निव्वळ उत्पन्न आर्थिक वर्ष २०१८ च्या पहिल्या तिमाहीतील ३४.२९ कोटी रुपयांवरून १७.०३ टक्क्यांनी वाढून ४०.१३ कोटी रुपयांवर गेला आहे.
‘या तिमाहीदरम्यान ३३ टक्क्यांचा विक्रमी विकास साधल्याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो. बाजारपेठेतील मागणीची स्थिती चांगली आहे आणि त्याला आमच्या वितरण, ब्रँड उभारणी व नवे ग्राहक संपादन उपक्रमांची जोड लाभल्यामुळे सर्वच विभागांत चांगली कामगिरी करणे शक्य झाले. बाजारपेठेतील हा हिस्सा आम्ही विस्तारत राहू आणि इंडस्ट्रीच्या विकासदराच्या तुलनेत तीन व चार पटींने जास्त विकास साधत वेगाने विकसित होत असलेली ल्युब्रिकंट कंपनी असे आमचे आणखी बळकच करू,’ असे रवी चावला, व्यवस्थापकीय संचाल, गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेड म्हणाले.
गल्फने बाजारपेठेपेक्षा जास्त वेगाने विकास साधत डिझेल इंजिन ऑइल्स (डीईओ) आणि मोटरसायकल इंजिन ऑइलमध्ये (एमसीओ) २५ टक्क्यांपेक्षा जास्त विकास नोंदवला, तर पॅसेंजर कार मोटर ऑइल (पीसीएमओ) विभागात ३० टक्क्यांचा विकासदर पार केला. ओई एम फॅक्टरी फिल्स आणि इंडस्ट्रीयल ड्रिस्टीब्युटर विभागांनीही उच्च विकासदर नोंदवला. व्यावसायिक वाहने, दुचाकी आणि ट्रॅक्टर यांसारख्या विविध उत्पादन प्रकारांच्या ओईएम वितरकांमध्येही विकासाचा वेग दिसून आला.
गल्फ आपल्या ब्रँड्समध्ये महत्त्वाकांक्षी गुंतवणूक करत राहाणार आहे. पीसीएमओ आणि सीव्हीओ – एलसीव्ही क्षेत्रासाठी आउटडोअर कॅम्पेन तसेच बीटीएल व्हॅन कॅम्पेन देशाच्या सर्व महत्त्वांच्या शहरांत घेण्यात आले. कंपनीचा आघाडीचा एमसीओ ब्रँड – गल्फ प्राइड फोर टी प्लस तमिळनाडूमध्ये नव्या पॅकसह परत लाँच करण्यात आले आणि त्याला प्रभावी प्रतिसादही मिळाला. आता उर्वरित देशातही त्याचे नव्या पॅककडे स्थित्यंतर होत आहे.
गल्फ ऑइलने परत एकदा यावर्षाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाशी करार केल्यामुळे सीएसके जर्सीवरील गल्फ ब्रँडने अनेकांचे लक्ष वेधन घेतले. नव्या गल्फ प्राइड फोरटी प्लस बॉटलचे चेन्नई आणि जयपूरमध्ये सीएसके संघाद्वारे ५०० पेक्षा जास्त ट्रेड पार्टनर्सच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.
तमिळनाडूमध्ये विशेषतः गल्फ ऑइलने यशस्वीपणे ‘इधू नम्मा प्राइड’ (म्हणजे, हा आमचा अभिमान) हे अभियान सोशल मीडिया तसेच आउटडोअर व्यासपीठांवर यशस्वीपणे राबवत सीएसके चाहत्यांना गल्फ प्राइड फोर टी प्लसशी जोडले. इधू नम्मा प्राइड सोशल मीडियावर ट्रेंड झाले तसेच त्याने तमिळनाडूमधील ग्राहक, रिटेलर्स, मेकॅनिक्स यांच्यात इंजिन ऑइलविषयी चर्चा घडवून आणली. सीएसके संघ गल्फ फॅन बसमध्ये चढल्यानंतर चाहते मोठ्या प्रमाणावर रस्ते व सोशल मीडियावर उतरले.
ग्रामीण भागात, गल्फने शेती क्षेत्रात ऑइल बदलासाठी शिबिरे घेणे सुरूच ठेवत त्याद्वारे भारतात ट्रॅक्टर मालक आणि मेकॅनिक्सपर्यंत पोहोतच अग्री- इंजिन ऑइल श्रेणी त्यांच्यापुढे मांडली. गल्फ उन्नती हा रिटेलर रॉयल्टी उपक्रम आघाडीच्या रिटेल भागीदारांमध्ये लोकप्रिय होत आहे, कारण त्यातून या तिमाहीत दोन आकडी विकासदर साधणे शक्य झाले.