मुंबई : ‘हिंदुजा ग्रुप कंपनी’च्या ‘गल्फ ऑईल लुब्रिकंट्स इंडिया लि.’ने दुचाकी वाहनांसाठी वापरण्यात येणाऱ्या आपल्या ‘गल्फ प्राइड ४टी प्लस’ या इंजिन ऑइलच्या नवीन आकर्षक पॅकच्या ‘री लॉंच’ची घोषणा केली. ‘गल्फ प्राइड ४ टी प्लस’ या इंजिन ऑइलमुळे दुचाकीचे इंजिन स्वच्छ राहते. तसेच गाडीच्या वेगवान ‘पीक अप’साठीही ते उपयोगी आहे.
विख्यात क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी या ‘गल्फ ऑइल’चा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असून त्याच्या हस्ते मुंबईत एका विशेष कार्यक्रमामध्ये या नवीन पॅकचे लॉंचिंग करण्यात आले. मुंबईतील दुचाकीबाजारपेठेमधील सुमारे ३०० विक्रेते या कार्यक्रमास उपस्थित होते.
मोटारसायकल इंजिन ऑइल बाजारपेठेमध्ये ‘गल्फ ऑइल लुब्रिकंट्स इंडिया लि.’चे नेहमीच महत्त्वाचे स्थान राहिलेले आहे. आता या इंजिन ऑईलच्या नवीन पॅकमधील री लॉंचिंगमुळे त्याचीबाजारपेठेमधील मागणी आणखी वाढणार आहे.
“गल्फ प्राइड ४टी प्लसच्या नवीन सादरीकरणामुळे या उत्पादनाचा ग्राहकांना दर्जाचा अनुभव देण्याचा दृष्टीकोन लक्षात येतो. ‘गल्फ प्राइड ४ टी’संदर्भातची नवीन कम्युनिकेशनची योजना लवकरच लॉंच केली जाईल. त्याद्वारे ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या ‘इन्स्टा पीकअप’चे महत्त्व विषद केले जाईल,” अशी माहिती ‘गल्फ ऑईल लुब्रिकंट्स इंडिया लि.’चे व्यवस्थापकीयसंचालक रवी चावला यांनी दिली.
‘गल्फ प्राइड ४टी प्लस ’ इंजिन ऑईलने ‘JASO MA2’ आणि व्हॉल्व ट्रेन वीअर’च्या तुलनेत चांगली कामगिरी नोंदवली आहे.
‘गल्फ प्राइड ४ टी प्लस’ हे ऑईल आता SAE 10W-30, SAE 20W-40 and SAE 20W-50 या तीन व्हिस्मोटिक्समध्ये उपलब्ध आहे.