
१५ वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार (संक्षिप्त फोटो)
रत्नागिरी (विशेष प्रतीनिधी): गुहागर तालुक्यातील पडवे मोहल्ला येथे एका अल्पवयीन गतिमंद १५ वर्षीय मुलीवर ४० वर्षीय इसमाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलगी गतिमंद असल्याचा फायदा घेवून सतत ७ दिवस तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी गुहागर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.
पडवे मोहल्ला येथे राहणारी श्रीमती तसलीम निसार शिरगावकर (४०) या महिलेने आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची फिर्याद गुहागर पोलीसात दाखल केली आहे. पडवे मोहल्ला येथेच राहणारा आरोपी मुस्तफा मिरकर वय सुमारे ४० याने आपल्या घराच्या गच्चीवर दि. ४ जानेवारी २०१८ ते १९ जानेवारी दरम्यान या मुलीवर जबरी बलात्कार केला, असे तिने आपल्या तक्रारीत नमुद केले आहे. पोलीसांनी या घटनेचा गुन्हा नोंद केला आहे. ३७६ (ज.ल.न) बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ चे कलम ४ , ६ , ८ , १० नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन या गुन्हयाचा तपास गुहागरचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ व उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे करीत आहेत.