रत्नागिरी (आरकेजी): गुहागर न.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या १३ उमेदवारांच्या अपात्रतेवर आज खेड येथील सत्र न्यायालयात निकाल दिला जाणार आहे. या निकालाकडे संपुर्ण जिल्हयाचे लक्ष लागून राहिले असून गुहागरवासीयांची उत्कंठा शिगेला पोचली आहे.
गुहागर नं.पं.च्या १७ प्रभागासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून २०, शहरविकास आघाडीकडुन १०, भाजपकडून १३, शिवसेनेकडुन ८, आरपीआयकडून १, तर अपक्ष ३ असे 5५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी १३ उमेदवाार अर्ज जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने ते अपात्र ठरले आहेत. आपल्या अवैध अर्जावर राष्ट्रवादी काँगे्रस, शहर विकास आघाडी, भाजप आपल्या प्रत्येक ३, तर शिवसेना २, अपक्ष १ सह नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या अपक्ष उमेदवार जिल्हा सत्र न्यायालयात अपिलात दाखल झाले आहेत. या अपिलाची सुनावणी २६ मार्च रोजी घेण्यात येणार होती. परंतु, ती तारीख बदलून २८ करण्यात आली. खेड येथील सत्र न्यायालयात काल दोन्ही बाजुंकडील युक्तीवाद न्यायालयात सादर करण्यात येवून न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. आज हा निकाल जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. या निकालाकडे उमेदवारांसह संपुर्ण जिल्हयाचे लक्ष लागून राहिले असले तरी या निकालाने संपुर्ण निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे.