मुंबई, (निसार अली) : गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत आज ठिकठिकाणी मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. बाईक रॅली, पारंपरिक वेशभूषा, रांगोळ्या, ढोलताशांच्या गजरात सण साजरा झाला. विक्रोळीत ५५०० पणत्या लावून दिपोत्सवातून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
मालवणी, विक्रोळी येथेही असेच भारावलेले वातावरण होते. मालवणी गेट क्रमांक ५ येथे मनसेचे माजी विभाग अध्यक्ष सतीश चवाथे यांनी उंच गुढी उभारली होती.
विक्रोळीतही सोमवारी नववर्षाच्या पुर्वसंध्येला दिपोत्सवा कार्यक्रम मठ मंदिर संस्कृती संवर्धन समितीने साजरा केला. मंगळवारी शोभायात्राही काढण्यात आली. कन्नमवार नगरातील बालगंर्धव मैदानात ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच’ या लोकमान्य टिळकांच्या सिहंगर्जनेला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिपोत्सवाची थीम ठेवण्यात आली होती. ५५०० पणत्या लावून दिपोत्सव साजरा झाला. विलास पारकर, जंयत दांडेकर, राहूल वाघधरे, निरंजन यमजाल, सुरेश वांगा, बिजू बालन, महेन्द्रा खोत, यांनी दिपोत्सव आणि शोभायात्रासाठी विशेष मेहनत घेतली.