~ जीटी प्राइम प्लस आणि जीटी फ्लाइंग टू व्हीलरवर ऑफर ~
मुंबई, १२ ऑक्टोबर २०२२: इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सच्या उत्पादनात एक अग्रगण्य असलेल्या जीटी फोर्सने, त्यांच्या लोकप्रिय टू-व्हीलर ईव्ही स्कूटर्स, जीटी प्राइम प्लस आणि जीटी फ्लाइंगवर ५,००० रुपयांची सवलत जाहीर केली आहे. दोन्ही स्कूटर्स, लीड-अॅसिड बॅटरी आणि लिथियम-आयन बॅटरीसह उपलब्ध आहेत. जीटी प्राइम प्लसची एक्स-शोरूम किंमत ५६,६९२ रुपये आहे, परंतु सवलतीच्या ऑफरसह, खरेदीदार तिला ५१,६९२ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. जीटी फ्लाइंगची मूळ किंमत ५२,५०० रुपये आहे, परंतु सणाच्या विशेष ऑफरसह, ग्राहक तिला केवळ ४७,००० रुपयांमध्ये घरी नेऊ शकतात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मर्यादित कालावधीची ऑफर ३१ ऑक्टोबरपर्यंत वैध असेल.
जीटी-फोर्सचे सह-संस्थापक आणि सीईओ श्री. मुकेश तनेजा म्हणाले, “आम्हाला आशा आहे की, जीटी फोर्सवरील मोठ्या सणाच्या सवलतीमुळे खरेदीदारांचे मनोबल लक्षणीयरीत्या वाढून त्यांच्या उत्सवात, आनंदात आणि उत्साहात भर पडेल. सध्या अनेक सण सुरू असताना, आमच्या उत्पादनांच्या ऑफरिंगद्वारे आपल्या प्रियजनांशी संपर्क साधण्याच्या प्रभावी आणि सुलभ माध्यमांना प्रोत्साहन देण्याचे आमचे ध्येय आहे. ग्राहकांना एकाच वेळी प्रतिष्ठित जीटी फोर्स उत्पादने तसेच त्यांच्यासोबत प्राप्त होणारे प्रेम आणि पूर्ततेची भावना घेऊन जाता आल्यामुळे, या सवलतीच्या ऑफरद्वारे त्यांच्या विश्वासाची पुष्टी करण्यास मदत होईल.”
जीटी प्राइम प्लस: जीटी प्राइम प्लस ही, कमी अंतराच्या प्रवासासाठी बनवलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे आणि ती लो-स्पीडच्या श्रेणीत मोडते. यामुळे, तिचा टॉप स्पीड २५ कि.मी. प्रतितास आहे. या मॉडेलचे, उच्च प्रमाणात इन्सुलेटेड बीएलडीसी मोटर आणि उच्च-शक्तीची ट्यूबलर फ्रेम अशी वैशिष्ट्ये आहेत. लीड-अॅसिड व्हर्शन बॅटरीची क्षमता ४८ व्होल्ट २८ अँपियर आवर आहे, जी एका चार्जवर ५० ते ६० किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. हा बॅटरी पॅक पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ७ ते ८ तास लागतात. लिथियम-आयन बॅटरीची क्षमता ४८ व्होल्ट २६ अँपियर आवर आहे आणि ती ६० ते ६५ कि.मी.च्या राइडिंगची रेंज देऊ शकते. लिथियम-आयन बॅटरी ४ ते ५ तासांत चार्ज होऊ शकते.
जीटी फ्लाइंग: जीटी फोर्सचे म्हणणे आहे की, जीटी फ्लाइंगला, विशेषतः कुटुंबे, महिला, गिग वर्कर्स आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. ही देखील लो-स्पीड श्रेणीमध्ये देखील येते, म्हणून तिचा टॉप स्पीड २५ कि.मी. प्रतितास पर्यंत मर्यादित आहे. हे मॉडेल उच्च-शक्तीच्या ट्यूबलर फ्रेमवर निर्माण करण्यात आले आहे आणि त्यात ड्युअल-ट्यूब तंत्रज्ञानासह फ्रंट हायड्रॉलिक आणि टेलेस्कोपिक रिअर डबल शॉकरचा समावेश आहे. लीड-अॅसिड व्हर्शनच्या बॅटरीची क्षमता, ४८ व्होल्ट २८ अँपियर आवर आहे आणि ५५ ते ६० कि.मी.ची राइडिंग रेंज आहे. हा बॅटरी पॅक पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ७ ते ८ तास लागतात. एका चार्जवर ६० ते ६५ कि.मी. च्या रेंजसह या लिथियम-आयन बॅटरीची क्षमता, ४८ व्होल्ट २६ अँपियर आवर आहे. हा बॅटरी पॅक पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ४ ते ५ तास लागतात.