नवी दिल्ली : जुलै 2017 साठी जीएसटीआर-2 भरण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2017 आहे. मात्र व्यापार आणि सर्व करदात्यांच्या सुविधेसाठी सक्षम अधिकाऱ्यांनी जुलै 2017 साठी जीएसटीआर-2 दाखल करायला 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच जुलै 2017 साठी जीएसटीआर-3 दाखल करायला 11 डिसेंबर 2017 (यापूर्वीची मुदत 10 नोव्हेंबर 2017) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भात लवकरच अधिसूचना जारी केली जाईल. यामुळे जुलै 2017 साठी जीएसटीआर-2 दाखल करणाऱ्या 30.81 लाख करदात्यांना दिलासा मिळणार आहे.