मुंबई : जीएसटीविषयी अनेक उद्योजक, नोकरदार आणि सर्वसामान्यांना अद्यापही सखोल माहिती मिळालेली नाही. तसेच जीएसटी विषयी बहुतांश माहिती इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. काहीजणांना अर्थकारणाची भाषा बोजड वाटते. या सगळ्या समस्या लक्षात घेऊन जीएसटी प्रणाली सहज सुलभ मराठी भाषेतून समजाविण्याचा विडा एका मराठी तरुणाने उचलला आहे. कुणाल गडहिरे यांनी आपल्या स्कीलसिखो डॉट कॉम (www.skillsikho.com) या संकेतस्थळावरुन ‘जीएसटीची अंमलबजावणी कशी करावी’ याविषयी मराठी भाषेत ऑनलाईन व्हिडीओ कोर्स सुरु केला आहे. हा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्णत: विनामूल्य असून कोणत्याही संगणक साक्षर व्यक्तीला सुलभरित्या हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. विविध स्टार्ट-अप्स आणि ई-कॉमर्स कंपन्यांना जीएसटी विषयी मार्गदर्शन करणारे सनदी लेखापाल गिरीश गावडे हे या अभ्यासक्रमास मार्गदर्शन करणार आहेत. www.skillsikho.com/courses या लिंकला भेट देऊन कोर्ससाठी विनामूल्य नोंदणी करता येईल. उद्योजक, व्यावसायिक, स्टार्ट अप्सनीं या संधीचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन स्कीलसिखो डॉट कॉमचे संस्थापक कुणाल गडहिरे यांनी केले आहे.