नवी दिल्ली: जीसॅट-17 या दळणवळण उपग्रहाचे 29 जून 2017ला एरियाना 5 प्रक्षेपकाद्वारे कौरु प्रक्षेपण तळावरुन यशस्वी प्रक्षेपण झाले. जीसॅट-17 ची सध्या कक्षा चाचणी सुरु असून लवकरच तो इन्सॅट/जीसॅट यंत्रणेत समाविष्ट केला जाणार आहे. अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.