रत्नागिरी दि.20:- गृहनिर्माण संस्थांच्या ई वर्गातील संस्था म्हणजेच 250 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या संस्थांच्या निवडणूका घेण्यासाठी 01 ऑक्टोबर 2021 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी विहीत अर्ज मागविण्यात येत आहेत. शासकीय विभागातील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कार्यरत अधिकारी/कर्मचारी (वरिष्ठ लिपिक किंवा त्यापेक्षा जादा दर्जा असलेला कर्मचारी), प्रमाणित लेखापरीक्षक, वकील (05 वर्ष कामाचा अनुभव), शासकीय स्थानिक संस्थेकडून निवृत्त झालेला अधिकारी/कर्मचारी (वयाची 65 वर्षे पेक्षा जास्त नसलेला) हे अर्ज करण्यास पात्र असून विहीत नमुन्यातील अर्ज 04 ऑक्टोबर 2021 पर्यंत (शासकीय सुटीचे दिवस वगळून) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रत्नागिरी पहिला मजला, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी इमारत, आरोग्य मंदिर, कॅनरा बँकेजवळ, के.एस.सी. रेसिडेन्सी समोर, रत्नागिरी येथे सादर करावेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांचे कार्यालय रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रत्नागिरी यांनी कळविले आहे.