
मुंबई, १९ ऑगस्ट २०२६: ग्रिप इन्वेस्टने आज फिक्स्ड-इन्कम गुंतवणुकीप्रती समर्पित ग्रेट इंडियन बाँड फेस्टिव्हल (जीआयबीएफ)च्या पहिल्या एडिशनचे अनावरण केले. १८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या दोन आठवड्यांच्या राष्ट्रीय मोहिमेची सुरुवात झाली आहे, या मोहिमेमध्ये वेन्यू पार्टनर म्हणून एनएसई आणि डिपॉझिटरी पार्टनर म्हणून एनएसडीएल सहभागी झाले आहेत. ही मोहीम नियामक, बाँड इश्यूअर्स, बाजारपेठ पायाभूत सुविधा संस्था, परिसंस्था सहयोगी आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणून रिटेल गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय म्हणून बाँड्स आणि इतर फिक्स्ड-इन्कम उत्पादनांबद्दल अधिक जागरूकता निर्माण करते.
भारतातील कॉर्पोरेट बाँड बाजारपेठ ५९ लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याची आहे, तरीही भारतातील १ टक्क्यापेक्षा कमी कुटुंबं बाँड्समध्ये गुंतवणूक करतात. ही बाब वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या व्यापक सहभागासाठी मोठी संधी दर्शवते. मोहिमेच्या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या विशेष ऑफरच्या पाठबळासह प्रिंट, डिजिटल, सोशल मीडिया, पॉडकास्ट, इन्फ्लुएन्सर्स आणि एफिलिएट्समध्ये पसरलेल्या सर्वांगीण मोहिमेद्वारे हे अंतर भरून काढण्याचे जीआयबीएफचे उद्दिष्ट आहे.
या मोहिमेला वेन्यू पार्टनर म्हणून एनएसई आणि डिपॉझिटरी पार्टनर म्हणून एनएसडीएलचे सहकार्य लाभले आहे, तर टाटा न्यू, ईटी मनी, मोबिक्विक, कम्पाउंड एक्सप्रेस (डीएसपी ग्रुप) आणि एलिव्हेस्ट बाय इन्शुरन्सदेखो हे परिसंस्था सहयोगी म्हणून मोहिमेमध्ये सामील झाले आहेत.
या लाँचबाबत मत व्यक्त करत ग्रिप इन्वेस्टचे संस्थापक निखिल अग्रवाल म्हणाले, “जीआयबीएफ उत्सव आणि जागरूकता उपक्रम दोन्ही आहे. एकीकडे, बाँड्समधील रिटेल सहभाग २०० टक्के सीएजीआरने वाढून वार्षिक ३०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. त्याच वेळी, बाँड्सबद्दलची समज आणि सहभाग अजूनही अत्यंत प्राथमिक स्तरावर आहे. जीआयबीएफ एक वार्षिक व्यासपीठ आहे, जे भारतातील रिटेल बाँड मार्केटच्या वाढीस योगदान देईल आणि फिक्स्ड-इन्कम गुंतवणुकीला मुख्य प्रवाहातील गुंतवणुकीच्या चर्चेत आणेल.”
मुंबईतील एनएसई अॅट्रियम येथे या फेस्टिव्हलचा शुभारंभ झाला. या प्रसंगी नियामक, इश्यूअर्स, रिटेल गुंतवणूकदार, वेल्थ अॅडव्हायझर्स, आयएफए, फॅमिली ऑफिस आणि फंड मॅनेजर्ससह आर्थिक क्षेत्रातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणारे २५० हून अधिक सहभागी उपस्थित होते. या इव्हेण्टमध्ये एनएसईचे सीबीडीओ श्री. श्रीराम कृष्णन यांचे उद्घाटनपर भाषण झाले, त्यानंतर सेबीच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्रीमती मनिंदर चीमा, सेबीचे चीफ जनरल मॅनेजर श्री. सरवणन कृष्णमूर्ती आणि ग्रिप इन्वेस्टचे संस्थापक व ग्रुप सीईओ श्री. निखिल अग्रवाल यांच्या उपस्थितीत भारतातील बाँड मार्केट अधिक दृढ करण्यावर पॅनेल चर्चा झाली. या इव्हेण्टमध्ये एनएसडीएलचे चीफ बिझनेस ऑफिसर श्री. समीर पाटील यांचे भाषण आणि डेब्ट मार्केट वितरणावर पॅनेल चर्चा देखील समाविष्ट होती.
एनएसईचे सीबीडीओ श्री. श्रीराम कृष्णन म्हणाले, “भारतातील फिक्स्ड-इन्कम मार्केटमध्ये सहभाग आणि विस्तार या दोन्ही दृष्टीने वाढण्याची मोठी क्षमता आहे. अवघ्या गेल्या चार महिन्यांत डेब्ट गुंतवणूकदारांचा पाया ३.२५ पट वाढला आहे, ज्यावरून फिक्स्ड-इन्कम गुंतवणुकीकडील वाढता कल दिसून येतो. गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करत आहेत, तसतसे या बाजारपेठेला अधिक प्रबळ करण्यासाठी बाँड्स अधिक परिचित, सुलभ आणि सहभागासाठी सोपे करणे महत्त्वाचे ठरेल. ग्रेट इंडियन बाँड फेस्टिव्हल सारखे उपक्रम अधिक जागरूकता निर्माण करण्यात आणि बाँड मार्केटमध्ये व्यापक सहभागाला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. एनएसईला या उपक्रमाचा भाग असल्याचा आनंद होत आहे आणि आम्ही भारतातील फिक्स्ड-इन्कम परिसंस्थेच्या वाढीस व विस्तारास पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
एनएसडीएलचे सीबीओ श्री. समीर पाटील म्हणाले, “भारतातील भांडवली बाजारपेठेत रिटेल सहभाग लक्षणीयरित्या वाढला आहे आणि सर्व मालमत्ता वर्गांमध्ये हा सहभाग वाढवण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. बाँड मार्केट आपल्या अफाट आकारासह आणि विविध उत्पादनांसह रिटेल गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये मोठी भूमिका बजावू शकते. यासाठी अधिक गुंतवणूकदार जागरूकता, सुलभ पोहोच आणि विश्वास व पारदर्शकतेवर सतत लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ग्रिप इन्वेस्टचा ग्रेट इंडियन बाँड फेस्टिव्हल उपक्रम या उद्दिष्टाला पाठबळ देण्यासाठी संपूर्ण परिसंस्थेमधील भागधारकांना एकत्र आणतो. एनएसडीएलला फिक्स्ड-इन्कम मार्केटमध्ये रिटेल सहभाग वाढवण्याच्या या प्रयत्नाचा भाग असल्याचा आनंद होत आहे.”














