रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने भगवा फडकवला आहे. तर मंडणगड, लांजा येथील ग्रामपंचायती राष्ट्रवादीने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. गुरुवारी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या.
रत्नागिरी तालुक्यातील भोके आणि मेर्वी या ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या दोन्ही ग्रा.पं. वर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. भोके ग्रामपंचायतीवर थेट सरपंचपदी सेनेचे शशिकांत म्हादये तर मेर्वी ग्रा.पं. वर श्रीपद मायंगडे निवडून आले. या दोन्ही उमेदवारांचे शिवसेना उपनेते, महाराष्ट्र म्हाडाचे अध्यक्ष ना. उदय सामंत यांनी अभिनंदन केले. दापोली तालुक्यातील भोमडी व बांधतिवरे या दोन ग्रमपंचायतीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला असून बांधतिवरे ग्रमपंचायतीच्या सरपंचपदी सुदेश डाकवे तर भोमडी ग्रमपंचायतीच्या सरपंचपदी अनंत निकम हे विजयी झाले आहेत. तालुक्यात तीन ग्रमपंचायतीच्या निवडणूकांचा कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला होता. यामध्ये कांगवई ग्रमपंचायत बिनविरोध करण्यात ग्रमस्थांना यश मिवाले. या ग्रमपंचायतीमध्ये थेट झालेल्या सरपंचपदाच्या निवडणूकीत अनंत गंगाराम निकम यांनी १७८ मते मिळवून विजय संपादन केला. तर त्यांचे प्रितस्पर्धी आतिष घाडगे यांना केवळ ८९ मतांवर समाधान मानावे लागले. तसेच महेश बा़ळाराम शिगवण, ललिता बटावळे आणि विनोद वाघमारे हे तीन सदस्य बिनविरोध निवडून आले. राजापूर व लांजा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये राजापूर तालुक्यातील तेरवण (श्रद्धा श्रीकृष्ण खानविलकर, सरपंच), भू (वसंत शांताराम तांबे, सरपंच), दसूर (सुचिता चंद्रकांत डिके, सरपंच), पेंडखळे(राजेश हरिश्चंद्र गुरव, सरपंच) व खिणगिणी(मानसी मनोज कदम, सरपंच) या ५ पैकी ५ ग्रा.पं. वर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर लांजा तालुक्यातील शिपोशी ग्रामपंचायत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आपल्याकडे राखली. खेड तालुक्यात दोन ग्रा.पं. साठी पोटनिवडणुक झाली. यामध्ये दिवाणखवटी ग्रामपंचायत राष्ट्रवादीने आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. तर वावे तर्फे नातू ग्रामपंचायतीवर सेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मंडणगड तालुक्यात लाटवण पिंपळगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे सरपंच होणार विराजमान तर दाभट ग्रामपंचायत बिनविरोध, लाटवण येथे राष्ट्रवादीचे विकास कासारे विजय झाले असून त्यांनी शिवसेनेचे विजय कासारे व भाजपचे महेश कासारे यांचा पराजय केला. तर पिंपळगाव येथे राष्ट्रवादीच्या प्रबोधिनी प्रमोद कदम या विजयी झाले आहेत. दाभट ग्रामपंचायत यांनी पन्नास वर्षांची परंपरा कायम राखून बिनविरोध झाली आहे. याठिकाणी सरपंच पदी सुषमा अमीर कासारे या विराजमान होणार आहेत.