मुंबई, (निसार अली) : मालाड पूर्वेतील कुरारगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामाता विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या शिक्षिका माधवी अनिल गमरे यांना 2017 – 18 चा महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुस्तकांचे गाव भिलार, महाबळेश्वर येथे हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे. त्यांच्या यशामागे शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक ,सहाय्यक सहकारी शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामुळेच शाळेचे नांव पुढे नेण्याचे सामर्थ्य मला मिळाले असे माधवी गमरे म्हणाल्या.
लहानपणापासूनच सामाजिक प्रश्नांचे भान असलेल्या गमरे मॅडमनी सामाजिक प्रश्नांवर आधारित लेखन केले आहे. त्यांच्या कार्यांचा ठिकठिकाणी गौरव करण्यात आला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने मालाड, कांदिवलीतील विविध संस्था, संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .