
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ) : गोविंद पॅराडाईज कॉम्प्लेक्स- विरार येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वतंत्र दिन निमित्ताने गजस्कंध सोसायटीचे अध्यक्ष राम कृपाल मंडल, व गोविंद पॅराडाईज बी विंग अध्यक्ष चंद्रशेखर काते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भारतमाता की जय, वंदे मातरम , छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जवान जय किसान, देशभक्ती पर गीते गाऊन घोषणाबाजी ने परिसर दणाणून गेला होता. खास एक शैक्षणिक उपक्रम हाती घेतला तो म्हणजे शालेय मुलांना वह्या वाटप करण्यात आले. या उपक्रमाला उत्तम प्रकारे अनेकांनी सढळ हस्ते स्वइच्छा देणगी देऊन सहकार्य केले.

गोविंद पॅराडाईज कार्यकारणी अध्यक्ष अमित भोसले, सचिव नितीन रसाळ, खजिनदार सचिन रेवंडकर, सल्लागार दत्ताराम गुरव, विशेष सहकार्य सुशील सावरकर ,साबाजी ठाकूर,मुख्य मार्गदर्शक निलेश रसाळ,मंगेश कडू,शाहीर संतोष पारदले, फोटोगग्राफी रोहित बाणे,राहुल तिवारी, तसेच आर्थिक स्वरूपात सहकार्य केलेल्या निलेश रसाळ,संजय किंद्रे,दत्ताराम गुरव,विनायक रसाळ,ज्ञानेश्वर पासलकर,सुशील सावरकर,अमित राऊळ, मधुकर शेपोंडे,ज्ञानदेव घाणेकर,कृष्णा डोर्लेकर,चंद्रशेखर काते,जयवंत आंबेकर , प्रदीप गमरे,ज्ञानेश्वर चव्हाण,दिलीप झा- ,उतम कानडे ,अक्षय गंभे, दिनेश तांबे ,सुनील भोगलं, राजेंद्र किंजलकर,सुनील वेंद्रे,विभूती तिवारी,सुनील शिंदे,सचिन रेवडकर, रोहित बाणे, एकनाथ रहाटे, सुरेश शेलार ,ललित मिश्रा यांचे विशेषतः आभार व्यक्त करण्यात आले.
असे उपक्रम घेणे एक वेगळा आनंद आहे आणि शाहीर नितीन रसाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, अशी कल्पना राबवण्याचा संदेश कॉम्प्लेक्सच्या रहिवाशी यांना दिला, असे शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविले जावेत असे गोविंद पॅराडाईज कॉम्प्लेक्सचे खजिनदार सचिन रेवडकर यांनी सर्व उपस्थित रहिवाशी याना मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले.
असा शालेय उपक्रम पाहून सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळाला. स्वइच्छा देणगी स्वरूपात आर्थिक मदत करून सर्वानी सहकार्य केले व उपक्रम पूर्णत्वास गेला त्याबद्दल शाहिर नितीन रसाळ यांनी सर्वांचे आभार मानले.














