मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्या आदेशाने आज राजभवन, मुंबई येथे त्यांच्या शासकीय वाहनावरील लाल दिवा उतरविण्यात आला.
राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी तसेच परिवार प्रबंधक वसंत साळुंके यांच्या उपस्थितीत राज्यपालांचे वाहन चालक मोहन सिंग बिश्त यांनी राजभवनातील जलविहारसमोरील जागेत राज्यपालांच्या गाडीवरील दिवा उतरविला.
देशातील व्हीआयपी संस्कृती संपविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यपालांनी आपल्या गाडीवरील लाल दिवा हटविण्याचे सूचित केले. राज्यपाल विद्यासागर राव तामिळनाडूच्या राज्यपालपदाचा देखील अतिरिक्त कार्यभार सांभाळत असून आजच चेन्नई राजभवन येथे तेथील राज्यपालांचे प्रधान सचिव रमेश चंद मीणा यांनी राज्यपालांच्या वाहनावरील लाल दिवा उतरविला.