
मुंबई: सुपर फूड म्हणून नावारूपाला आलेल्या ब्रोकोलीच्या लागवड प्रचार आणि प्रसारासाठी केंद्र सरकार सेंटर ऑफ एक्सलन्स उभारेल, लागवड, साठवणूक आणि प्रक्रियेसाठी आवश्यक ते सहकार्य केंद्र सरकारकडून करण्यात येईल,अशी ग्वाही कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे (MoA&FW) उपायुक्त ( नैसर्गिक शेती आणि हवामान बदल) डॉ. मेहराज ए. एस. यांनी दिली.
मुंबईत आयोजित ‘ब्रोकोली कंझम्पशन परिषद-2026’ चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय कृषी आयुक्त
डॉ.पी के सिंग, जपानचे वाणिज्य दूत यागी कोझी, विशेष अतिथी डॉ.मेहराज ए.एस, सकाटा सीड्चे व्यवस्थापकीय संचालक केंजी ताकीकावा, जेवियर बरनाबू ( स्पेन मधील ब्रोकोली क्रांतीचे जनक) आणि प्राध्यापिका डॉक्टर शालिनी आर्या उपस्थित होत्या.
परिषदेचे उद्घाटन करताना सकाटा सीड चे संचालक रमेश शिरगुप्पी म्हणाले,” ब्रोकोली परिषद 2016 भाजीपाल्याच्या क्षेत्रामध्ये पहिलाच प्रयत्न आहे. आरोग्य आणि आनंद प्रत्येकासाठी ही या परिषदेची थीम असून ब्रोकोली च्या लागवडीपासून तर काढणी आणि विक्रीपर्यंतच्या सर्व घटकांना एकत्रित या निमित्ताने बोलावले आहे. ही परिषद भविष्याची गुंतवणूक असून आरोग्यदायी जीवनासाठी प्रत्येकाच्या ताटात ब्रोकोली चा समावेश व्हावा यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. तरुणांपासून जेष्ठांपर्यंत ‘ब्रोकोली इज गोल्ड’ ‘होली-हो -या- दिवाली’ रोज खाये ब्रोकोली, अशा पद्धतीचा जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाटा सीड्चे व्यवस्थापकीय संचालक केंजी ताकीकावा यांनी सकाटा सीड्सच्या भारतातील 2008 पासून सुरू झालेल्या सतरा वर्षाच्या प्रवासावर प्रकाश टाकला. ब्रोकोलीच्या लागवड ते प्रक्रिया या प्रक्रियेतील सर्व घटकांना या परिषदेच्या निमित्ताने एकत्र आणलं असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. मेहराज ए. एस म्हणाले, ‘ भाजीपाल्याच्या क्षेत्रामध्ये होणारी ही पहिलीच ब्रोकोली परिषद असून मूल्यवर्धन प्रक्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात महत्त्वाची ठरणार आहे. शेतकऱ्यांना लागवड कशी करावी हे शिकवण्याची गरज नाही तर त्यांना फक्त मार्केट दिले पाहिजे. ब्रोकोलीच्या क्षेत्रात आपण सेंटर ऑफ एक्सलन्स उभारू शकतो. त्यासाठी जपान सरकारकडून मदत मिळवता येईल. बटाट्यासाठी असलेली कोल्ड स्टोरेज सुविधा ब्रोकोली साठी सुधारित करावे लागेल. भविष्यात सेंद्रिय पद्धतीने केलेली ब्रोकोली लागवड देखील महत्त्वाची ठरते त्यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जपानचे वाणिज्यदुत यागी कोझी म्हणाले, ‘ ब्रोकोली हे पीक जपानचे मूळ नाही. जपान सरकारच्या प्रयत्नाने ब्रोकोली जगभर वाढली. नैसर्गिक रित्या सुपर सीड असलेले ब्रोकोली जपानमधून 170 देशांमध्ये पसरली आहे. भारतासाठी आम्ही भारताच्या हवामानाप्रमाणे बीज उत्पादन केले. भारताच्या पोषण आणि सर्वांगीण विकासासाठी ब्रोकोली महत्त्वाचा घटक ठरत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या परिषदेच्या निमित्ताने क्रिकेटर
कृष्णामाच्चारी श्रीकांत यांचे मोटिवेशनल भाषण झाले. श्रीकांत म्हणाले, ‘ मी ज्यावेळेस क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यावेळेस हेल्थ हा महत्त्वाचा विषय नव्हता. परंतु आता माझी पत्नी मला आठवड्यात चार वेळा ब्रोकोली सुप प्यायला देते. क्रिकेट खेळत असताना नेहमीच मी नैसर्गिक खेळाला प्राधान्य दिले. आरोग्यदायी आयुष्या बरोबरच
आनंद आयुष्य जगण्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे ते प्रत्येकाने केले पाहिजे. क्रिकेट आणि जीवनातील विविध अनुभवांचे कथन करताना त्यांनी सुखी आयुष्य जगण्याचा मूलमंत्र देखील या भाषणामध्ये उपस्थित त्यांना दिला.
शिनया किमोरा यांनी त्यानंतर ब्रोकोलीच्या विश्वव्यापी प्रचार आणि प्रसार तसेच संधीं बद्दल सादरीकरण केले. त्यानंतर ब्रोकोली फूड आणि हेल्थ या विषयावर झालेल्या परिसंवादात डॉ.नाझीन हुसेन, डॉ. ताईशेटे, डॉ. शालिनी आर्या, संतोष मोरे, मारुती चापके आणि विवेक नायक यांनी सहभाग घेतला. ब्रोकोलीचे आरोग्यदायी फायदे तसेच रेसिपी ब्रोकोली चे उत्पादन या विषयावर या परिसंवादामध्ये चर्चा झाली. स्पेन या देशांमध्ये विविध पातळीवर प्रचार प्रसिद्धी आणि जनजागृती करून ब्रोकोली कशी वाढली या विषयाचे सादरीकरण जेवियर बरनाबू ( स्पेन मधील ब्रोकोली क्रांतीचे जनक) यांनी केले. आंतरराष्ट्रीय कलाकारांनी लाईफस्टाईल कोच न्यूट्रीशनालिस्ट क्लाऊडीया सीएस्ला यांनी भारतातील कुपोषण ते अतिपोषण या विषयाची तुलना करताना ब्रोकोली चे आरोग्यदायी फायदे तसेच पोषण मूल्यांवर माहिती देत हे सुपररीच ब्रोकोली फूड असल्याचे आवर्जून सांगितले.
दुसऱ्या चर्चासत्रामध्ये ब्रोकोली कोल्ड चेन हा विषय होता. अविनाश जोशी, आकाश अग्रवाल,संतोष सहाने आणि राजन वारे या परिसंवादामध्ये सहभागी झाले होते.
ब्रोकोली साठी आवश्यक गोल्ड चेन उभारणी तसेच प्रिकुलिंग आणि वाहतुकीबाबत परिसंवादामध्ये सखोल चर्चा झाली.
परिषदेचा एक भाग असलेली कुकिंग कॉम्पिटिशन सेलिब्रिटी मास्टर शेफ संजीव कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संजीव कपूर यांनी स्वतःचे ब्रोकोली बाबतचे अनुभव कथन करताना चार भाज्यांपैकी ब्रोकोली माझी आवडती भाजी असल्याचे सांगितले. माझ्या पहिल्या फुड टीव्ही शो मध्ये ब्रोकोलीची डिश केल्याची आठवण देखील त्यांनी यावेळी आवर्जून सांगितली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सकाटासिड्चे मार्केटिंग हेड किशोर गायकवाड यांनी केले.















