रत्नागिरी : गोवर रुबेला लसीकरण मोहिम समिती बैठक आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. पी.एन. देवकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी एम.आर. आरगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, मुख्याधिकारी रत्नागिरी अरविंद माळी, निवासी वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत शेरखाने तसेच सामाजिक कार्यकर्ते, शाळांचे प्रतिनिधी आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 27 नोव्हेंबर 2018 रोजी होणाऱ्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेसंदर्भात आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. यावेळी गोवर रुबेला लसीकरणाबाबत सादरीकरण करण्यात आले. गोवर रुबेला लस ही जगामध्ये 197 देशामध्ये आतापर्यंत देण्यात आली असून ती पूर्णपणे सुरक्षित आहे. गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत ९ महिन्याचा बालकांपासून 15 वर्षे वय मुल, मुली या सर्वांनी ही गोवर रुबेला लस मिळाली पोहिजे, यापासून कोणीही वंचित राहू नये. यासाठी गोवर रुबेला लसीकरणाची व्यापक प्रसिध्दी करा. तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर याबाबत जनजागृत्तीसाठी मॅरेथॉन, सायकलिंग सारखे उपक्रम राबवा अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी दिल्या.
याबैठकीत गोवर रुबेला लसीकरणाबाबत जनतेमध्ये असलेल्या शंका, अफवाबाबतचे निराकरण करण्यात आले.