मुंबई, २६ मे २०२१: चलनसमूहाच्या तुलनेत अमेरिकी डॉलर कमकुवत पडल्याने सोन्याचे दर वाढले. तर कमोडिटी दरांवर अंकुश लावण्याच्या चीनच्या प्रयत्नांमुळे बेस मेटल दबावाखाली राहिले. तथापि, वाढत्या मागणीमुळे तसेच जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये मजबूत सुधारणेमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांना आधार मिळाला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
सोने: यूएस ट्रेझरी उत्पन्न आणि अमेरिकेची आर्थिक आकडेवारी कमकुवत दिसून आल्याने मंगळवारी, स्पॉट गोल्डने १ टक्क्यांची वृद्धी झाली व ते १८९९.३ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. लोअर ग्रीनबॅकमुळे डॉलरच्या किंमतीतील धातू इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाला. बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीमध्ये नुकतीच झालेली घसरण आणि चीनकडून मागमी वाढण्याच्या चिन्हांमुळे पिवळ्या धातूच्या किंमतींना मजबुती मिळाली.
तथापि, वेगवान लसीकरणामुळे जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये वेगाने सुधारणा होण्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे बाजारातील जोखिमीची भूक वाढली आणि पिवळ्या धातूंच्या दरवाढीवर काही मर्यादा आल्या. यासोबतच, यूएस फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांनी अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्याच्या तात्पुरत्या आशावादामुळे सध्याची दरवाढ झाल्याचे सांगून चलनवाढीची चिंता कमी दर्शवली. चलनवाढीच्या चिंता कमी झाल्याने सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याचे आकर्षण कमी झाले. कारण सोने हा चलनवाढीवरील उतारा समजला जातो.
कच्चे तेल: कालच्या व्यापारी सत्रात, डब्ल्यूटीआय क्रूडचे दर 0.03 टक्क्यांनी काहीसे वाढले व ते 66.1 डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. तेल बाजारातील मागणीत सुधारणेच्या आशावादामुळे तेलाचे दर वाढीव दिसून आले. प्रमुख अर्थव्यवस्थांवरील महामारीमुळे लावण्यात आलेले निर्बंध हटवले जात आहेत. जगभरातील वेगवान लसीकरण मोहिमेमुळे तेलाच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इराणीयन तेल पुरवठ्यास सुरुवात झाल्याने अतिरिक्त पुरवठ्याची संभाव्य चिंताही यामुळे कमी झाली आहे.
बेस मेटल: कालच्या व्यापारी सत्रात, एलएमईवरील औद्योगिक धातूचे दर संमिश्र दिसून आले. या समूहात झिंकने सर्वाधिक नफा कमावला. चीनने कमोडिटीचे वाढते दर मर्यादित ठेवण्याचे ठरवल्याने औद्योगिक धातूसाठीची चिंता कायम आहे. चीनने कमोडिटी मार्केटवर बारकाईने नजर ठेवण्याचे ठरवल्यानंतर तसेच अतिरिक्त सट्टे आणि होर्डिंगसाठी कठोर शिक्षा सुरू केल्याने तांबे आणि इतर औद्योगिक धातूंनी महिन्याच्या सुरुवातीच्या काळात मिळवलेला नफा गमावला. मात्र त्याच कालावधीत औद्योगिक उत्पादन अपेक्षित गतीपेक्षा कमी झाले.