मुंबई, २५ ऑगस्ट : अमेरिका-चीनमधील संबंधांत सुधारणा आणि अमेरिकी डॉलरमधील सुधारणेमुळे औद्योगिक धातूंना आधार मिळण्याचे संकेत आहेत. तरीही जगभरात कोरोना विषाणूमुळे रुग्णसंख्येत निरंतर वाढ होत असल्याने या किंमतींवर मर्यादा येत असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. सोमवारी स्पॉट गोल्डचे दर ०.३६ % नी घसरून १९३२ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. कोव्हिड-१९ लसीबाबतचा आशावाद यामुळे गुंतवणुकदारांच्या जोखीम भावनांना चालना मिळाली. अमेरिकेच्या कोरोना रिलीफ बिलाचा करार डेमोक्रेट्स आणि रिपब्लिकन्स यांच्यादरम्यान अपयशी ठरला. त्यामुळेही सोन्याच्या किंमतींवर परिणाम झाला. तथापि, साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या मंदिवर अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे चेअर जेरोम पॉवेल यांची काय प्रतिक्रिया असेल, यावर गुंतवणूकदारांच्या नजरा आहेत.
कच्चे तेल: डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाचे दर ०.७% नी वाढले व ते ४२.६ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. कोरोना व्हायरसवर मात करणाऱ्या लसीच्या विकासाबद्दल गुंतवणुकदारांमध्ये आशा वाढल्याने तसेच अमेरिकेतील पुरवठा चिंतेमुळेही कच्च्या तेलाचे दरव वाढले. अमेरिकेतील मेक्सिकोतील निम्म्याहून अधिक तेल उत्पादन कंपन्यांनी उत्पादन बंद केल्यानेही तेलाच्या किंमतींना आधार मिळाला. मार्को चक्रिवादळ आणि लॉरा ट्रॉपिकल यांच्या दुहेरी संकटामुळे दररोज सुमारे १.०७ दशलक्ष बॅरल तेलाचे उत्पादन ठप्प झाले. वादळाचे संकट, अमेरिका-चीनमधील तणाव कमी झाल्यामुळे तसेच कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एमसीएक्सवर तेलाच्या किंमती आजच्या सत्रात सावधगिरीने व्यापार करतील, असे दिसते.
बेस मेटल्स: झिंक वगळता गेल्या आठवड्यात बेस मेटल एलएमईवर सकारात्मक दिसून आले. एलएमई झिंक (३ महिन्यांसाठी) ०.४३% घटला आणि २४४५.५ डॉलरवर बंद झाला. चीनच्या अर्थव्यवस्थेतील भरपूर वृद्धी आणि कोरोना विषाणूवर लस विकसित होण्याची वाढती आशा यामुळे औद्योगिक धातूंचे दर वाढले. तसेच विषाणूच्या नव्याने लाट आल्याने बोलिव्हियाची झिंक, लिड आणि चांदीची खाण सॅन क्रिस्टोबल ही दुस-यांदा बंद झाली.
जुलै २०२० मध्ये चीनकडून अॅल्युमिनिअमची आयात ३९९१,२९७ टन झाली, जी मागील ११ वर्षांमधील सर्वाधिक मासिक निर्यात ठरली. परिणामी जुलै २०१९ मधील आयात ५७०% नी वाढली. आधीच्या महिन्यापेक्षा ३५% नी वाढली. या वर्षाच्या सुरुवातीला इंडोनेशियाने फिलिपाइन्सवर कच्च्या निकेलच्या पुरवठ्यावर बंदी घातल्यानंतर फिलिपाइन्च्या कच्च्या निकेलचे उत्पादन २८% नी वाढून १०२,३१० एवढे झाले.
तांबे: सोमवारी, एलएमई तांब्याने ०.४% ची वृद्धी घेतली. एलएमई प्रमाणित गोदामांमधील माल कमी झा्ल्यामुळे ते ६५१.० डॉलर प्रति टनांवर बंद झाले.