मुंबई : फाल्कन स्पोर्ट्सच्या अग्रता मेलकुंडेने आपल्या लौकीकानुसार कामगिरी करत इंडिया मास्टर्स अॅथलेटिक्स आणि मास्टर्स अॅथलेटिक्स ऑफ महाराष्ट्र आयोजित पंचरंगी अॅथलेटिक्स स्पर्धेत 16 वर्षाखालील मुलींच्या गोळाफेक स्पधर्र्ेत अव्वल स्थान मिळवले. अग्रताने 11.52 मीटर अशी फेक करत प्रथम क्रमांक मिळवला. या लढतीत होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कुलची तन्वी नायडु दुसर्या स्थानावर राहीली. तन्वीने 10.78 मीटर अशी फेक करत आपले दुसरे स्थान निश्चित केले. व्हीपीएम स्पोर्टसची दिव्या रावत (9.98 मीटर) तिसर्या क्रमांकाची विजेती ठरली. याच वयोगटातील मुलींच्या लांब उडी स्पर्धेत उदयांचल स्कुलच्या सरोज चव्हाणने बाजी मारली. सरोजने अव्वल स्थान पटकावताना 4.81 मीटर अशी कामगिरी नोंदवली. ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्स क्लबच्या रेश्मा गोरेने 4.67 अशी कामगिरी साधत दुसरा क्रमांक मिळवला. होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कुलची अदिती चाळकेला (4.66 मीटर) तिसर्या क्रमांकावर मानावे लागले.
इतर निकाल : 14 वर्षे वयोगट मुली : 80 मीटर हर्डल्स : अलिझा मुल्ला ( होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कुल)13.02 सेकंद, इशिका इंगळे (होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कुल) 13:19 सेकंद, तान्या वकिल (टिम बीपीपी भायखळा) 13: 84 सेकंद. महिला : 200 मीटर : रश्मी शेरेगर( व्हिपिएम स्पोर्ट्स क्लब) 25:08 सेकंद, एकता गौलकर (सेव्हन स्टार्स स्पोर्ट्स अॅकेडमी) 26:54 सेकंद, सरोज शेट्टी (स्प्रिंटर्स स्पोर्ट्स क्लब) 26:61 सेकंद.