Ratnagiri : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल व ध्येय अॅकॅडमी ऑफ स्कील डेव्हलपमेंट, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास उपक्रमांतर्गत बॉश इंडिया लि.चा ‘ब्रीज’ नावाचा एम्प्लॉयबिलिटी कोर्स चालविला जातो. या कोर्सची दुसरी बॅच सध्या सुरु आहे. या बॅचच्या विद्यार्थ्यांकडून जागतिक कौशल्य विकास दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे दि. १५ जुलै २०२२ रोजी आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी अॅकॅडमीच्या डायरेक्टर सौ. पुजेश्वरी कदम, श्री. राधेय पंडित, महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत उपस्थित होते. तसेच स्टार युनियन डाई-इची या इन्शुरन्स कंपनीचे रत्नागिरीतील पदभार असलेले श्री. अमित खानविलकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विशेष किटचे वाटप बॉश कंपनीतर्फे करण्यात आले. दोन्ही बॅचच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आय.आय.एफ.एल.करिता ‘दि. २७ जुलै रोजी कॅम्पस ड्राईव्ह’
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलमार्फत आय.आय.एफ.एल. फायनान्स लि. या फायनान्शियल सर्व्हिस क्षेत्रातील नामवंत कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २७ जुलै २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या मुलाखती डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल, मुख्य इमारत येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
कंपनीच्या रत्नागिरीतील ब्रांचकरिता ‘कंपनी केअर एक्झिक्युटिव्ह’ या पदाकरिता सदर मुलाखती होणार आहेत. महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून बी.कॉम., बी.एम.एस., बी. कॉम. (अकौंटिंग अँड फायनान्स) इ. पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी उपस्थित राहू शकतात.
अधिक माहितीकरिता प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत (मोबा. ९४२११४२५२९) यांच्याशी संपर्क साधावा आणि या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.















