मुंबई : गोदरेज एरोस्पेसने शंभराव्या एअरफ्रेम असेंब्लीच्या सेटचे ब्राह्मोज एरोस्पेस प्रा. लि. (बीएपीएल)ला आज हस्तांतरण केले. मिसाइल यंत्रणांच्या वापरासाठी हे हस्तांतरण करण्यात आले आहे, यामुळे भारतीय सुरक्षा क्षमतांच्या उभारणीमध्ये योगदान देण्याची कंपनीची परंपरा पुढे चालू राहिली आहे.
ब्राह्मोज एरोस्पेसचे डिस्टिंग्विश सायंटिस्ट आणि डिरेक्टर जनरल (ब्राह्मोज), सीईओ आणि एमडी, डॉ. सुधीर मिश्रा यांनी गोदरेज एरोस्पेसला भेट दिली. गोदरेज अँड बॉइसचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जमशेद एन. गोदरेज यांच्याकडून शंभराव्या ब्राह्मोज एअरफ्रेमचे दस्तऐवजांचे हस्तांतरण स्वीकारण्यासाठी एका खास समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
मिश्रा यांनी ब्राह्मोज मिसाइलच्या एअर लाँच व्हर्जनसाठीच्या शंभराव्या एअरफ्रेम युनिटची ऑर्डर प्राप्त केल्याबद्दल आणि उत्पादन सुरू केल्याबद्दल गोदरेज एरोस्पेसचे अभिनंदनही केले.
गोदरेज अँड बॉइसचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जमशेद एन. गोदरेज म्हणाले की, “गोदरेज आणि ब्राह्मोज तब्बल 17 वर्षांपासून भागीदार आहेत. अनेक वर्षांपासून आम्ही देशउभारणीच्या कामात अभिमानास्पद कामगिरी करत आहोत, भारतीय सुरक्षा क्षमतांच्या उभारणीत आमचे भरघोस योगदान आहे. डॉ. मिश्रा यांना शंभराव्या एअऱफ्रेम असेंब्लीच्या सेटच्या पूर्ततेचे दस्तऐवज हस्तांतरीत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.आपल्या देशी बनावटीचे उत्पादन याद्वारे देशसेवा करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
ब्राह्मोज एरोस्पेस डीएसचे डायरेक्टर जनरल, सीईआणि एमडी डॉ. सुधीर मिश्रा म्हणाले की,“गोदरेजने अनेक वर्षांपासून ब्राह्मोज आणि भारतीय सुरक्षा क्षेत्रात भरीव योगदान दिलेले आहे. मिसाइल एअरफ्रेमच्या शंभराव्या सेटचा पुरवठा करणे हा आमच्या दीर्घकालीन नातेसंबंधांतील सर्वात मोठा टप्पा आहे. यापुढेही आमची भागीदारी अशाच प्रकारे नवनवीन टप्पे गाठेल.”
ब्राह्मोज मिसाइल हे युनिव्हर्सल सुपरसोनिक क्रूज मिसाइल असून, जहाजे, उपसमुद्री, एअरक्राफ्ट आणि जमिनस्थित व्यासपीठांवरून सादर केले जाते. याद्वारे जमीन आणि समुद्रातील लक्ष्य अचूक भेदली जातात.
गोदरेज एरोस्पेस ब्राह्मोज उपक्रमाशी स्थापनेपासून म्हणजेच 2001 सालापासून संलग्नित आहे. गोदरेजने ब्राह्मोज मिसाइलच्या मेटॅलिक सब सिस्टम्समधील बहुतांश योगदानात भरीव योगदान दिले आहे. मुख्य एअरफ्रेमबरोबरत गोदरेजने कंट्रोल सरफेस आणि नोज कॅपचाही पुरवठा केला आहे. याशिवाय गोदरेजने जमिनीवरील व्हर्जनसाठी मोबाइल ऑटोनॉमस लाँचर्स, मिसाइल रिप्लेनिशिंग व्हेइकल्ससुद्धा पुरवली आहेत