आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या समाप्तीपर्यंत भारतीय इलेक्ट्रिक फोर्कलिफ्ट बाजारपेठेचा २०% हिस्सा काबीज करण्याचे उद्धिष्ट
मुंबई: गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडचे बिझनेस युनिट गोदरेज मटेरियल हँडलिंगने तीन चाकी इलेक्ट्रिक फोर्कलिफ्ट ट्रक विभागात पदार्पण केल्याची घोषणा केली आहे. लिफ्ट ट्रक्सची देशातील सर्वात मोठे उत्पादक असलेल्या गोदरेज मटेरियल हँडलिंग (जीएमएच) ने आपल्या ब्रावो फोर्कलिफ्ट ट्रकचा नवीन तीन चाकी इलेक्ट्रिक प्रकार बाजारपेठेत आणला असून हा १.६ ते २ टन श्रेणीसाठी तयार करण्यात आला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा – https://www.youtube.com/watch?
ब्रावो ला संपूर्णपणे भारतात तयार करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांच्या संशोधन आणि विकासानंतर तयार करण्यात आलेल्या ब्रावोचा उद्देश भारतीय बाजारपेठेच्या गरजा आणि मागण्या पूर्ण करणे हा आहे. याचा आकार आटोपशीर व सुटसुटीत असून याची प्रवासाची वेग क्षमता (एका तासात १५ किमी) या श्रेणीत सर्वात जास्त आहे. या ट्रकची वळण त्रिज्या (चार चाकी ट्रकपेक्षा २५% कमी) श्रेणीमध्ये सर्वोत्तम असून त्यामुळे ट्रकचे संचालन अधिक सक्षमतेने करता येते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एक मानक वैशिष्ट्य म्हणून सर्व तीन चाकी ब्रावो फोर्कलिफ्ट्समध्ये नवीन वेट डिस्क ब्रेक्स लावलेले असतात ज्यामुळे ब्रेकिंग क्षमता वाढते आणि ट्रक चालवताना ऑपरेटरला जास्त मेहनत करावी लागत नाही. वेट डिस्क ब्रेक्समुळे या ट्रक्सचा सर्विसिंग इंटर्वल देखील ६००० तास इतका जास्त आहे, त्यामुळे हा ट्रक अधिक जास्त विश्वसनीय आणि उपयुक्त बनला आहे.
गोदरेज मटेरियल हँडलिंगचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट व बिझनेस हेड अनिल लिंगायत यांनी सांगितले, “आमच्या ग्राहकांचे व्यवसाय निरंतर सुरु राहावेत असे आम्हाला वाटते. आम्ही आमच्या प्रत्येक कामामध्ये नावीन्यपूर्णतेला प्राधान्य देत असतो आणि आमच्या उत्पादनांना पर्यावरणस्नेही बनवण्याचा प्रयत्न करतो. आधुनिक तीन चाकी ब्रावो सीरिज आम्ही आपल्या देशात विकसित केली आहे आणि यामध्ये वरील सिद्धांताचे पालन करण्यात आले आहे. कामगिरी आणि सुरक्षा यामध्ये सुधारणा घडवून आणणाऱ्या आधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा हा ट्रक आपल्या श्रेणीमध्ये नावीन्य आणि सुरक्षेचे नवे मापदंड स्थापित करेल. वेअरहाऊस ऑपरेशन्सच्या क्षमता वाढवण्यात याचे मोलाचे योगदान असेल. आम्हाला आशा वाटते की, हा ट्रक सर्व थ्रीपीएल, वेअरहाऊसेस आणि ई-कॉमर्स कंपन्यांसाठी उपयुक्त ठरेल.”
तीन चाकी ब्रावो इलेक्ट्रिक फोर्कलिफ्टमधे आधुनिक बॅटरी तंत्रज्ञान वापरले असल्याने खूप मोठा रनटाईम मिळतो. स्मार्ट कर्व्ह व्हील कंट्रोल तंत्रज्ञानामुळे वळण येणार आहे हे समजते आणि ट्रकचा वेग २५% कमी केला जातो. यामुळे ट्रक स्थिर राहतो आणि ऑपरेटर या ट्रकला अरुंद जागांमध्ये देखील सहजपणे चालवू शकतात. याची फ्रेम गुरुत्वाकर्षण केंद्र खाली राहावे यासाठी डिझाईन केलेली असल्यामुळे हा ट्रक ६ मीटर उंचीपर्यंत वजन उचलण्यासाठी सक्षम बनला आहे. इंटरॅक्टिव्ह एलसीडी डिस्प्लेवर गती, तापमान, मुव्हमेंट, बॅटरी आणि फॉल्ट अलर्ट यासारखी महत्त्वाची माहिती ऑपरेटरला मिळत राहते.