कोव्हिड– 19 साथीविरोधात संघर्षासाठी योगदान देणाऱ्या करोना वॉरियर्सची दखल घेण्यासाठी डिजिटल फिल्म सादर ; मदर्सऑफमेनीकाइंड्स, मदर्सडे
मुंबई, 10 मे : मातृदिनाच्या निमित्ताने सर्व मातांना आदरांजली वाहण्यासाठी गोदरेज समूहाने #मदर्सऑफमेनीकाइंड्स ही हृदयस्पर्शी डिजिटल फिल्म सादर केली आहे.
मातृत्वाचे गुणधर्म केवळ आईमध्ये नाही, तर आजच्यासारख्या अवघड काळात प्रत्येक व्यक्तीमध्ये आढळतात हे तत्व अधोरेखित करण्यासाठी गोदरेजने ही फिल्म सादर केली आहे. नर्सेसपासून डॉक्टर्सपर्यंत प्रत्येकाने आपल्याला बरं करण्यासाठी रात्री जागवल्या, आपल्या खाद्यपदार्थांचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी धडपड केली, आपले पोलिस दल आणि सुरक्षा दलाने आपण सुरक्षित राहू याची खात्री केली, तर एनजीओ तसेच करोना वॉरियर्स, ज्यांनी अडचणीत असलेल्या आपल्या मित्रपरिवाराला मदत केली. त्याचप्रमाणे करोना विषाणूविरोधातल्या या लढतीची जबाबदारी घेऊन सावधान राहाण्यासाठी मदत करणाऱ्या सरकारचेही कौतुक करायला हवे.
या फिल्मविषयी गोदरेज समूहाचे कार्यकारी संचालक आणि प्रमुख ब्रँड अधिकारी तान्या दुबाश म्हणाल्या, ‘या जीवघेण्या विषाणूविरोधातल्या संघर्षात प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या आपल्या हिरोंच्या कामाचे आम्ही कायमचे ऋणी आहोत. मातृत्वाचे गुण आपल्या सभोवताली प्रत्येकामध्ये दिसतात आणि या संघर्षात आपल्या मदत करणाऱ्या नर्सेस, डॉक्टर्स, पोलिस, स्वच्छता कर्मचारी, शेतकरी, सुरक्षा दल आणि आपल्या अत्यावश्यक वस्तू पोहोचवणारे वितरण कर्मचारी यांनी ते दाखवून दिले. आपण प्रत्येकानेच #मदर्सऑफमेनीकाइंड्स ही प्रचिती घेतली आणि जगातील लोकांची काळजी घेण्यासाठी मातृत्व वेगवेगळ्या रुपात दिसत आहे.’
व्हिडिओची युट्यूब लिंक : https://youtu.be/n01UZjoIsCA