मुंबई : गोदरेज समूहाच्या गोदरेज अँड बॉइजने आज बांबूसा ही बांबूपासून बनवलेल्या सायकली लाँच केल्या. या सायकलींच्या फ्रेम पूर्णपणे बांबूपासून बनवलेल्या असून त्यामुळे त्या टिकाऊ आणि वजनाला अतिशय हलक्या आहेत. नेहमीच्या स्टील आणि एल्युमिनियम फ्रेम सायकलींपेक्षा त्या वेगळ्या आहेत.
विजय क्रिस्ना, कार्यकारी संचालक, गोदरेज लॉकिम म्हणाले की, ‘गोदरेज अँड बॉइसमध्ये आम्ही ग्राहकांना त्यांच्या गरजा भागवणारी नाविन्यपूर्ण उत्पादने पुरवण्यासाठी सातत्याने काम करत असतो. मात्र, नाविन्याला टिकाऊपणाची जोड आवश्यक असते. बांबूसा सायकल याच दिशेने घेतलेली एक मोठी झेप आहे. पर्यावरणस्नेही आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर लाभदायक ठरू शकतील. आम्ही बांबूची विशिष्ट प्रजाती निवडली असून तिचे नाव – सोउडो – ऑक्सिटेनांनथेरास्टॉक्सी आहे.’
बनविण्याची प्रक्रिया
बांबू बाइक- फ्रेम्स हाताने तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक फ्रेम वेगळी आहे. योग्य बांबू निवडण्यासाठी काळजीपूर्वक प्रक्रिया तयार केली जाते. त्याअंतर्गत बांबूवर योग्य सोपस्कार करून किडे व वातावरणापासून सुरक्षित राहील याची काळजी घेतली जाते, तशी चाचणी घेतली जाते व त्यानंतरच फ्रेम बनवली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया पुण्याबाहेरील कारखान्यात तयार करण्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये देशभरातील कठीण रस्त्यांवर ४४०० किलोमीटर प्रवास करून या बाइकने आपली ताकद आणि टिकाऊपणा सिद्ध केला आहे. गोदरेज बांबूसा सायकल्स सध्या पांढऱ्या व खाकी रंगाच्या सॅडलमध्ये उपलब्ध आहेत.
या सायकल्स केवळ www.Fueladream.com. या क्राउडफंडिंग (सार्वजनिक निधी) प्लॅटफॉर्मद्वारे खरेदी करता येतील.