मुंबई : गोदरेज अँड बॉयसचा व्यवसाय असलेल्या गोदरेज कन्स्ट्रक्शन कंपनीने स्थानिक सरकारी अधिकारी आणि प्रमुख बांधकाम कंत्राटदारांच्या मदतीने गेल्या दोन वर्षांत 10 हजार टन्स कचऱ्यावर प्रक्रिया केली आहे. मुंबई शहरात तयार होणाऱ्या या कचऱ्यापासून गोदरेज कन्स्ट्रक्शन वीटा आणि पेव्हर्स तयार करत आहे. या राडारोड्यावर नूतनीकरण प्रक्रिया केल्यामुळे शहराच्या लँडफिल्समध्ये कचऱ्याची आणखी भर पडलेली नाही. कंपनी शाश्वत विकासाशी बांधील असून या काँक्रीट कचऱ्यापासून भिंती आणि फ्लोअरिंगसाठी काँक्रीट पेवर ब्लॉक्ससाठी उच्च दर्जाचे पोकळ आणि भरीव ब्लॉक्स तयार करत आहे. पुनर्नूतनीकरणातून बनवण्यात आलेली ही काँक्रीटची उत्पादने चांगल्या प्रतीच्या दगड आणि वाळूसह कच्चा माल वापरून तयार केल्या जाणाऱ्या अशाप्रकारच्या इतर काँक्रीट उत्पादनांच्या बरोबरीची आहेत.
गोदरेज कन्स्ट्रक्शनतर्फे विक्रोळी, मुंबई येथील रिसायकल्ड काँक्रीट मटेरियल्स (आरसीएम) उत्पादन कारखान्यात पुनर्नूतनीकरण केलेले काँक्रीट ब्लॉक्स आणि पेव्हर्स बनवले जातात. आरसीएम कारखाना हा एक हरित उपक्रम असून तेथे ‘रिकव्हर, रिसायकल आणि रिबिल्ड’ हे सूत्र वापरून कंपनी कशाप्रकारे चक्राकार अर्थव्यवस्थेस हातभार लावण्यासाठी कशाप्रकारे बांधील आहे हे दाखवले जाते. पुनर्नूतनीकरण केलेल्या या काँक्रीट ब्लॉक्सला इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिलची (आयजीबीसी) मान्यता मिळाली असून ती या उत्पादनांच्या शाश्वत स्वरुपावर शिक्कामोर्तब करणारी आहे. या काँक्रीट ब्लॉक्स आणि पेव्हर्सची वैशिष्ट्ये, ताकद आणि इतर तांत्रिक बाबी बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या अशाप्रकारच्या काँक्रीट उत्पादनांसारख्या किंवा त्यापेक्षा जास्त चांगल्या आहेत.
गोदरेज कन्स्ट्रक्शनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख म्हणाले, ‘शाश्वत विकासाचा प्रसार करण्यास गोदरेज कन्स्ट्रक्शन बांधील आहे. स्वयंचलित आरसीएम उत्पादन कारखान्याची स्थापना हे कंपनी आपली तत्वे कशाप्रकारे आचरणात आणते याचे उत्तम उदाहरण आहे. या आरसीएम उत्पादन कारखान्यामुळे बांधकामाच्या राडारोड्यापासून चांगले मूल्य असलेली उत्पादने तयार करणे शक्य झाले असून ही बाब आपले पर्यावरण आणि व्यवसायासाठी फायदेशीर आहे.’
सध्या या पुनर्नूतनीकरण केलेली ही काँक्रीट उत्पादने आघाडीच्या स्थावर मालमत्ता कंपन्यांच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये वापरली जात आहेत. केवळ एका मुंबई शहरात दररोज बांधकामाचा एक हजार टनांपेक्षा जास्त राडारोडा तयार होतो. पुनर्नूतनीकरण केलेल्या काँक्रीट साहित्यामुळे दगड आणि वाळू काढण्याच्या खाणींवरचा ताण कमी होतो. पर्यायाने नैसर्गिक स्त्रोतांची मागणी तसेच पर्यावरणावर होणारा वाईट परिणाम कमी होतो. या निमित्ताने चक्राकार अर्थव्यवस्थेचे तत्व जपले जाते. त्याचप्रमाणे या नव्या उपक्रमामुळे काँक्रीट बांधकाम आणि बांधकाम उध्वस्त केल्यावर तयार होणारा राडारोडा लँडफिल्समध्ये टाकण्याचे प्रमाण कमी होईल