स्वयंचलित गोदाम उभारणी क्षेत्रात पुढील 3 वर्षात 100 टक्के वाढीचे लक्ष्य
मुंबई, 2 ऑगस्ट, 2021 : गोदरेज समुहातील ‘गोदरेज अँड बॉइस’ या प्रमुख कंपनीचा एक संयुक्त उद्योग असलेल्या ‘गोदरेज क्योर्बर’ या कंपनीला एका आघाडीच्या बहुराष्ट्रीय रंग उत्पादक कंपनीच्या उत्तर प्रदेशातील ग्रीनफील्ड सुविधेशी संलग्न स्वयंचलित गोदाम उभारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण ऑर्डर मिळाली आहे. पुरवठा साखळीतील गुंतागुंतीच्या कामकाजात तंत्रज्ञान व कौशल्य यांच्या आधारे अतुलनीय स्वरुपाची कामगिरी करण्यासाठी ‘गोदरेज अँड बॉइस’ने जर्मनीमधील ‘क्योर्बर एजी’ या कंपनीशी भागीदारी केली असून ती बळकट होण्यामध्ये ही ऑर्डर मोलाची ठरणार आहे.
‘रिसर्च अँड मार्केट्स’ या संस्थेच्या एका अहवालानुसार, 2020 मध्ये भारतातील गोदाम उभारणीच्या व्यवसायाचे बाजारमूल्य 1,050 अब्ज रुपये इतके होते. 2021 आणि 2025 दरम्यान हे मूल्य वर्षाकाठी 14.86 टक्क्यांनी वाढेल व 2025 मध्ये ते 2028.86 अब्ज रुपयांपर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे. भारत हे जागतिक उत्पादनाचे केंद्र बनण्यासाठी अत्यंत आवश्यक अशी सरकारी धोरणे राबविली जात असताना, कोरोना साथीच्या काळात ई-कॉमर्स या क्षेत्राचीदेखील वाढ झाली आणि वेळेवर व किफायतशीर पद्धतीने ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञान असलेल्या ‘अ’ दर्जाच्या गोदामांची गरज अनेक पटींनी वाढली. या पार्श्वभूमीवर, पुरवठा साखळीच्या गुंतागुंतीच्या कामकाजात तज्ज्ञ असलेल्या ‘गोदरेज क्योर्बर’ने जर्मनीतील ‘क्योर्बर एजी’च्या सहकार्याने भारतात गोदाम उभारणीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी 150 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.
या नवीन प्रकल्पामुळे कंपनीला उत्तर प्रदेशातील सांडिला येथील तिच्या ग्रीनफिल्ड सुविधेत उत्पादित झालेल्या 15 हजार टन इतक्या सजावटीच्या आणि औद्योगिक प्रकारच्या रंगांची हाताळणी व साठवण अखंडपणे व्यवस्थापित करण्यात मदत होईल. ही संपूर्ण प्रणाली ‘वेअरहाऊस मॅनेजमेंट सिस्टम’द्वारे (डब्ल्यूएमएस) व्यवस्थापित केली जाते; जी ‘क्लायंट ईआरपी’सह (ओरॅकल) अखंडित कामकाजाशी संलग्न आहे. कंपनीच्या सुविधेमधील ही प्रस्तावित प्रणाली भूकंपरोधी असून, तीमध्ये ‘डबल डीप लिनीअर स्टॅकर क्रेन्स’ आणि 15,000 हून अधिक ‘स्टोरेज लोकेशन्स’ आहेत. ही लोकेशन्स व क्रेन्स ‘इनपुट/आऊटपुट कन्व्हेयर्स’शी व ‘ऑटोलिफ्ट’शी जोडलेली आहेत. त्यातून कारखाना व गोदाम यांच्यात एक प्रकारचा पूल तयार होईल. यातील ‘डिस्पॅच विभाग’ हा फुल पॅलेट तसेच ‘पार्शल पिकिंग’ (रेनबो पॅलेट प्रीपरेशन), ‘रेल गाईडेड व्हेईकल्स’ (आरजीव्ही), ‘कन्व्हेयर्स’ आणि ‘पिक-टू-लाइट सोल्यूशन्स’ यांच्याद्वारे हाताळणीसाठी सुसज्ज आहे.
‘गोदरेज क्योर्बर’चे वरिष्ठ उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख नरेश ताहिलियानी म्हणाले, “भारतात, गोदरेज अँड बॉइस ही कंपनी गेल्या अनेक दशकांपासून ‘इंट्रालॉजिस्टिक्स’ची कार्यक्षमता सुधारण्यासाठी विविध उपाय प्रदान करून ग्राहकांना मदत करीत आहे. ‘क्योर्बर’सोबतच्या आमच्या भागीदारीमुळे आम्हाला पुरवठा साखळीमध्ये या उपायांचा विस्तार करण्यास मदत झाली आहे. यामध्ये आम्ही आमच्या भागीदारांसह उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम श्रेणीतील तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करीत आहोत. पुरवठा साखळी प्रक्रियांमध्ये जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब केल्यामुळे, आम्ही आमच्या ग्राहकांना ‘एंड-टू-एंड ऑटोमेशन सोल्यूशन्स’ प्रदान करण्यास आणि त्यांच्या ऑपरेटिंग कार्यक्षमतेत आणखी सुधारणा करण्यास सक्षम होऊ. अशा विविध प्रकारच्या उपाययोजना ग्राहकांना देण्याची पात्रता आमच्याकडे आहे, हे या नव्या ऑर्डरमुळे सिद्ध होते. आमचे वैविध्यपूर्ण उपाय अमलात आणल्याने या रंगांच्या उत्पादकाला त्याच्याकडील कुशल कामगार व अभियंते यांचे काम कुशलतेने व्यवस्थापित करण्यात मदत होईल; त्यायोगे जीवनाची गुणवत्ता सुधारेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. भारतातील स्वयंचलित गोदाम उभारणीच्या बाजारपेठेत पुढील 3 ते 5 वर्षांत वार्षिक 14 ते 20 टक्क्यांची वाढ होईल, असा आमचा अंदाज आहे. आगामी 3 वर्षात ‘गोदरेज क्योर्बर’ची प्रगती 25 टक्क्यांहून अधिक प्रमाणात व्हावी, असे आमचे उद्दिष्ट आहे.”
कोरोना साथीच्या काळात, ‘गोदरेज क्योर्बर’ने डिजिटल संभाषणाद्वारे आपल्या ग्राहकांना 24×7 दूरस्थ पद्धतीने मदत केली. कंपनीने भौतिक संवादाला पर्याय म्हणून आवश्यक साधने आणि तंत्रज्ञान वापरले आहे.
‘गोदरेज अँड बॉइस’ची क्योर्बर समूहासोबतची भागीदारी 2015 मध्ये सुरू झाली. त्यावेळी एका संयुक्त उपक्रमात ‘गोदरेज’ची भागीदार असलेली पोर्तुगालची ‘इफॅसेक हँडलिंग सोल्यूशन्स’ ही कंपनी ‘क्योर्बर’ने अधिग्रहीत केली होती. त्यानंतर या संयुक्त उपक्रमाचे नाव ‘गोदरेज कन्सोवेयो’ असे ठेवण्यात आले आणि – या वर्षाच्या सुरुवातीला त्याचे नामकरण पुन्हा ‘गोदरेज क्योर्बर’ असे करण्यात आले. या भागीदारीमुळे ‘गोदरेज क्योर्बर’ ही कंपनी पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतागुंतीचे कामकाज करण्यातील, तसेच सॉफ्टवेअरपासून ‘मटेरिअल हॅंडलिंग ऑटोमेशन’ व ‘लाईफ सायकल सर्व्हिसेस’ पुरवण्यातील भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखली जाऊ लागली. या भागीदारीमुळे ‘गोदरेज क्योर्बर’ला युरोप आणि इतर आशियाई देशांमध्ये सोल्यूशन्स निर्यात करण्याची संधी मिळाली आहे.
सन 2020मध्ये, पुरवठा साखळी तंत्रज्ञानाचे सोल्यूशन देणाऱ्या जगभरातील अव्वल 12 कंपन्यांनी ‘क्योर्बर’ या सामाईक ब्रँडमध्ये आपण संक्रमण करीत असल्याची घोषणा केली. यामध्ये ‘गोदरेज अँड बॉइस’ची पूर्वीची भागीदार असलेल्या ‘कन्सोवेयोचा’ही समावेश होता. या कंपन्या एकत्रितपणे एक जागतिक पुरवठा साखळी तंत्रज्ञानाचे केंद्र उभारीत असून त्यातून त्या विविध प्रकारची उत्पादने व सेवा पुरवीत आहेत. सॉफ्टवेअर, ऑटोमेशन, व्हॉईस, रोबोटिक्स, मटेरियल हँडलिंग उपकरणे, तसेच सिस्टम इंटिग्रेशन आणि कन्सल्टिंग यांचा त्यामध्ये समावेश आहे.