दुग्ध उत्पादने, पोल्ट्री आणि इतर आवश्यक खाद्यपदार्थांचा पुरवठा ग्राहकांना सुरळीतपणे होत राहावा यासाठी कंपनीने उचलले पुढचे पाऊल
मुंबई, 9 मे : गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेड (जीएव्हीएल) या वैविध्यपूर्ण कृषी उद्योग कंपनीने झोमॅटो आणि स्विगी या फूड डिलिव्हरी ऍप्ससोबत भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. सध्याच्या कोविड-१९ साथीच्या काळात देखील आपल्या ग्राहकांना आवश्यक खाद्यपदार्थांचा पुरवठा सुरळीतपणे होत रहावा यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
या भागीदारी अंतर्गत गोदरेज ऍग्रोवेटची उपकंपनी क्रीमलाईन डेअरी त्यांच्या गोदरेज जर्सी या ब्रँडमध्ये आवश्यक खाद्यपदार्थ पोहोचवणार आहे. यामध्ये दूध, तूप, दही, पनीर, ताक इत्यादींचा समावेश असेल. बिग बास्केट आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईट्सवर ही सर्व उत्पादने आधीपासून उपलब्ध असून आता हैद्राबाद, चेन्नई आणि विशाखापट्टणम येथील ग्राहक जर्सी उत्पादनांची मागणी झोमॅटो आणि स्विगीवर देखील नोंदवू शकतात. सर्वात जवळच्या जर्सी रिटेल पॉइंट्समधून ही उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवली जातील. चेन्नई आणि विशाखापट्टणम येथे या ऍप्समार्फत डिलिव्हरी सुरु करण्यात आली आहे. तेलंगणा राज्यात झोमॅटो आणि स्विगीमार्फत फूड डिलिव्हरीवरील निर्बंध समाप्त केले गेल्यानंतर हैद्राबादमध्ये त्यांच्या सेवा सुरु केल्या जातील. या ऍप्समुळे दिवसाच्या कोणत्याही वेळी अगदी कमी वेळात ग्राहकांना ही उत्पादने मिळू शकतील.
फ्रोझन स्नॅक्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी गोदरेज टायसन फूड्स लिमिटेडने देखील मुंबई, कोलकाता आणि गुवाहाटीमध्ये स्विगीसोबत भागीदारी केली आहे. नगेट्स, पॅटीज, कबाब्स, टिक्काज आणि कोल्ड-कट्स अशी गोदरेज यम्मिज ब्रॅण्डची फ्रोजन स्नॅक्स उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवली जातील. गोदरेज टायसनने मुंबईमध्ये रिअल गुड चिकन आणि गोदरेज यम्मिज या ब्रँड्स अंतर्गत उत्पादनांची डिलिव्हरी करण्यासाठी हौसिंग सोसायटी डिलिव्हरी मॉडेल देखील सुरु केले आहे. या सेवांमुळे ग्राहकांना घरी सुरक्षित राहून आपल्या प्रोटीन गरजा पूर्ण करता येतील.
या उपक्रमाविषयी गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेडचे एमडी बलराम सिंग यादव यांनी सांगितले, “स्विगी आणि झोमॅटोसोबत आम्ही तयार केलेल्या या यंत्रणेमुळे आमच्या ग्राहकांना घरी सुरक्षित राहून त्यांच्या दररोजच्या आहारात प्रोटिन्सचा समावेश करणे सहजशक्य होईल. गोदरेज ऍग्रोवेटमध्ये आमच्या प्रत्येक कामात, प्रत्येक निर्णयात ग्राहकांना केंद्रस्थानी मानले जाते. गोदरेज यम्मिज, रिअल गुड चिकन आणि गोदरेज जर्सी या आमच्या ब्रॅंड्समध्ये आम्ही उत्पादनांची विशाल श्रेणी उपलब्ध करवून दिली आहे आणि आता या नवीन यंत्रणेमुळे आमच्या ग्राहकांसोबतचे आमचे नाते अधिक जास्त घट्ट होईल.”
क्रीमलाईन डेअरी प्रोडक्ट्स लिमिटेडने देखील एक उपक्रम हाती घेतला आहे ज्यामुळे हौसिंग सोसायट्यांना जर्सी ब्रँडची खाद्य उत्पादने थेट ऑर्डर करता येतील. गोदरेज जर्सीने एक स्टोर फाईंडर सुरु केले आहे, यामध्ये जर्सी पार्लर्स नेमकी कुठे आहेत ते समजते. हैद्राबाद, वारंगल, निझामाबाद, करीम नगर, विजयवाडा, विझाग गुंटूर, चेन्नई, बंगलोर आणि उर्वरित आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथे २५० पेक्षा जास्त जर्सी पार्लर्स आहेत. याशिवाय या जर्सी पार्लर्समार्फत पनीर, तूप, दही इत्यादी विविध प्री-पॅक्ड डेअरी उत्पादनांची डिलिव्हरी देखील उपलब्ध करवून दिली जात आहे.
गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेड
गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेड (जीएव्हीएल) ही संशोधन आणि विकास यावर आधारित वैविध्यपूर्ण कृषी उद्योग कंपनी आहे. भारतीय ग्राहकांची उत्पादनक्षमता वाढावी तसेच पिके आणि पशु यापासून जास्त उत्पादन मिळावे यादृष्टीने नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा ही कंपनी सादर करते. पशुखाद्य, पीक संरक्षण, तेल, डेअरी, पोल्ट्री आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे.