मुंबई : गोदरेज ग्रुप या वैविध्यपूर्ण समूहाने आज ‘भारतीय शेतीच्या भविष्याला आकार देणे’ यावर आधारित कृषी परिषदेचे आयोजन केले होते. किसानदिवसच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने कॉर्पोरेट, समाज व शिक्षणतज्ज्ञ अशा संबंधित घटकांची भूमिका अधोरेखित करणे, हे यापरिषदेचे उद्दिष्ट होते.
शेतकऱ्यांचे घरटी उत्पन्न लक्षणीय वाढण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम केले जाईल, तसेच या क्षेत्राकडे अधिकाधिक महिला व युवक यांचे लक्ष कशा प्रकारे वेधता येईल,यासाठी पर्याय शोधण्याच्या हेतूने कॉर्पोरेट, नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन, शिक्षणक्षेत्र व माध्यमे एकत्र आली होती. याबरोबरच, त्यांनी पोषण व रोजगार या दृष्टीनेमिलेट्स व प्रोटिनचे स्रोत, यांच्या योगदानावरही चर्चा केली.
यानिमित्त बोलताना, गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक नादीर गोदरेज यांनी सांगितले, “2022 वर्षापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने सरकार शेती क्षेत्रावर विशेष भर देत असून, आम्ही या क्षेत्राच्या प्रगतीविषयी अतिशय सकारात्मक आहोत वशेतकऱ्यांसाठी या क्षेत्रात प्रचंड क्षमता असल्याचे आम्हाला दिसते आहे. समविचारी प्रोफेशनल व शिक्षणतज्ज्ञ एकत्र आल्याने शेतीच्या महत्त्वाबाबत जागृतीकरण्यासाठी मदत होणार आहे.”
कलावती व्ही., रत्नम्मा एम., मायाबाई व नीलम साहू या महिला शेतकऱ्यांनी त्यांचे अनुभव व शेतीतील कथा सांगितल्या. या परिषदेमध्ये उद्योगातील मान्यवरसहभागी झाले होते. डॉ. अविनाश किशोर, रिसर्च फेलो, आयएफपीआरआय; दिलीप एन. कुलकर्णी, अध्यक्ष, शाश्वत शेती व धोरण, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड;रघुनाथन एन., सह-संस्थापक, वृत्ती; जिनेश शहा, संस्थापक भागीदार, ओम्निव्होअर; अरुण अम्बतीपुडी, संस्थापक विश्वस्त व सल्लागार, चेतना ऑरगॅनिक; डॉ.यास्मीन अली हक, युनिसेफ हेड इंडिया; शेफ हरपाल सिंग सखी, कुरुष दलाल; कलिनरी अँथ्रोप्रलॉजिस्ट आणि बालकृष्णन एस., सीओओ, वृत्ती यावेळी सहभागी झाले होते.
याविषयी बोलताना, गोदरेज अॅग्रोव्हेटचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंह यादव म्हणाले, “शेती क्षेत्रामध्ये प्रचंड संधी उपलब्ध आहेत आणि या घडामोडींमध्ये आघाडीवर राहण्याचे गोदरेजचे उद्दिष्ट आहे. संशोधन व तंत्रज्ञान यावर भर देऊन, या क्षेत्राच्या उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाय योजण्याचा आमचा प्रयत्न असतो.”
गोदरेज इंडस्ट्रीज लि.चे सस्टेनेबिलिटी हेड विकास गोस्वामी यांनी नमूद केले, “महिला शेतकरी वर्ग हा भारतीय शेतीचा कणा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था भरभराटीलायेण्याच्या दृष्टीने, महिला शेतकऱ्यांच्या मदतीने आम्ही शाश्वत शेती पद्धती पुनरुज्जीवित करणे महत्त्वाचे आहे. मिलेट्सबरोबर शाश्वत शेती पद्धतींची सांगड घातल्यास मातीच्या दीर्घकालीन आरोग्यावर व उत्पादकतेवर सकारात्मक परिणाम होईल. या परिषदेच्या निमित्ताने, शेती क्षेत्रामध्ये महिला बजावत असणाऱ्या भूमिकेची दखल घ्यायची आहेच, शिवाय त्यांचे हे योगदान सर्वांसमोर आणायचे आहे.”